Marathi News> मनोरंजन
Advertisement

Indian Idol फेम अभिजीत सावंत सध्या कुठंय? वारंवार पाहिला जातोय त्याचा VIDEO

Indian Idol या रिअॅलिटी शोला पहिल्या भागापासूनच कमालीची लोकप्रियता मिळाली. या शो चे स्पर्धक, परीक्षक आणि सारंकाही अगदी कालपरवाच घडलं होतं इतकं सर्वांच्या लक्षात आहे.   

Indian Idol फेम अभिजीत सावंत सध्या कुठंय? वारंवार पाहिला जातोय त्याचा VIDEO

Trendin Video : Indian Idol या रिअॅलिटी शोच्या पहिल्याच पर्वानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. भारतासाठी जिथं रिअॅलिटी शो ही संकल्पनाच नवी होती अशा दिवसांमध्ये हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि इथूनच देशातील मनोरंजन क्षेत्रात रिअॅलिटी शोचा पायंडा पाडला गेला. 

Indian Idol मुळं एका चेहऱ्यानं कमाल लोकप्रियता मिळवली आणि तो चेहरा म्हणजे या शो मधील स्पर्धक अभिजीत सावंत. शोदरम्यान अभिजीतला प्रचंड प्रेक्षकपसंती मिळाली. अनेक प्रेक्षकांनी त्याला मतं देत या कार्यक्रमात जिंकवूनही दिलं. शो संपला, या नवोदित गायकाचा 'आपका अभिजीत सावंत' हा अल्बमही लाँच झाला. 2005 मध्ये अभिजीतनं 'आशिक बनाया आपने' या चित्रपटासाठी गाणंही गायलं. 

काही वर्ष उलटली, तो प्रसिद्धीझोतात होता. पण, एकाएकी काळ, दिवस आणि तंत्रज्ञान सारंकाही झपाट्यानं बदलत असताना रिअॅलिटी शोची संकल्पनाही बदलली आणि नव्या चेहऱ्यांच्या आड अभिजीत कुठेतरी लपला गेला. याच अभिजीतनं 2009 मध्ये 'लॉटरी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रातही त्याचं नशिब आजमावलं. 

अभिनय क्षेत्रातून पदार्पण करणाऱ्या अभिजीतनं 'तीस मार खान' या चित्रपटातून एक लहानशी भूमिकाही साकारली. पण, त्याच्या अभिनय कारकिर्दीला अपेक्षित यश मिळालं नाही. पुढे त्यानं इंडियन आयडॉलमध्येच सूत्रसंचालनही केलं. अनेक वर्षे उलटूनही हा अभिजीत तितकाच लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : मोदींनी प्रकाश राज यांच्या Reply मुळे Delete केली 'ती' पोस्ट? आता Screenshots व्हायरल

 

 

मुख्य प्रवाहापासून दूर अभिजीत गायनाचे कार्यक्रम करतच होता. सध्या याच पहिल्यावहिल्या रिअॅलिटी स्टारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. अनेकांच्याच सोशल मीडिया फीडवरही हा व्हिडीओ दिसत आहे. जो नेटकरी वारंवार पाहताहेत. या व्हिडीओमध्ये अभिजी त्याच्या कुटुंबासह घरातून थेट डिस्नीलँडला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. 

सुट्टी कोणाला नाही आवडत? अभिजीतही याला अपवाद नाही. व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळताच त्यानं कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आणि थेट अमेरिका गाठली. तिथं जाऊन एका वेगळ्या दुनियेचा आनंद लुटणाऱ्या अभिजीतनं त्याच्या फॉलोअर्ससाठीसुद्धा आपल्य़ा सुट्ट्यांमधील काही क्षण सोशल मीजियावर  शेअर केले. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहताना अनेकांनच्याच मनात सुट्ट्यांचा विचारही आला. काय म्हणता? तुम्हीही त्यातलेच?

Read More