Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : रेल्वे मंत्र्यांनाही 'गली बॉय'ची भुरळ; म्हणतात 'तेरा टाईम आयेगा'

रेल्वे मंत्रीही यामुळे 'गली बॉय'ने प्रभावीत

VIDEO : रेल्वे मंत्र्यांनाही 'गली बॉय'ची भुरळ; म्हणतात 'तेरा टाईम आयेगा'

मुंबई : झोया अख्तर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'गली बॉय' या चित्रपटाची लोकप्रियता दिवसागणीक वाढतच आहे. या चित्रपटाची रॅप या प्रकारातील गाण्यानी प्रेक्षकांना विशेष भुरळ घातली आहे. अशा या गाण्यांच्या यादीतील एक सर्वाधिक पसंती मिळवणारं गाणं म्हणजे अपना टाईम आयेगा... तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या गाण्याचे बोल सध्या स्टेटसपासून एखाद्या फोटोच्या कॅप्शनसाठीही वापरण्यात येत आहे. अशा या गाण्याची दखल सध्या भारतीय रेल्वे मंत्रालयाने घेतली असून, खुद्द पीयुष गोयल यांनाही 'अपना टाईम....'ने भुरळ घातली आहे. 

गोयल यांचं ट्विट पाहून याचा अंदाज येत आहे. 'अपना टाईम'च्याच धाटणीचं 'तेरा टाईम आयेगा' हे गाणं त्यांनी पोस्ट केला आहे. या गाण्यात रेल्वेने प्रवास करतेवेळी रांगेत असणाऱ्यांना उद्देशून 'तेरा टाईम आयेगा' असं म्हणण्यात आलं आहे. तर, टीसीचा उल्लेख करत तुमच्यावर त्यांची करडी नजर असल्याचं म्हणत 'तेरा टाईम आयेगा'चा उल्लेख होत आहे. रेल्वे प्रवासाच्या धर्तीवर साकारण्यात आलेलं हे गाणं अनेकांनी शेअर करत त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

गाण्याच्या व्हिडिओच्या शेवटी तिकिट काढून प्रवास करण्यापेक्षा प्रगत कार्यप्रणालीचा वापर करत युटीएस अॅप, एटीव्हीएमला प्राधान्य देण्याची बाबही अधोरेखित केली आहे. खुद्द रेल्वे मंत्रीही यामुळे 'गली बॉय.ने प्रभावीत झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे रणवीर सिंगसाठी आणि संपूर्ण 'गली बॉय'च्या टीमसाठीही ही एक मोठी बाब आहे. 

Read More