Highest Paid TV Actor in India : सध्या सगळ्यात जास्त मानधन घेणारा टीव्ही अभिनेता कोण आहे माहितीये? प्रभास, अजय देवगण सारख्या कलाकारांसोबत काम केलेला अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्या आधी त्या अभिनेत्यानं छोट्या पडद्यावर काम केलं आहे. पण आता त्यानं 8 वर्षांनंतर टिव्हीवर कमबॅक केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अभिनेता कोण आहे? तर हा अभिनेता दुसरा कोणी नसून शरद केळकर आहे. शरद केळकर हा चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील जगातील सगळ्यात मोठं नाव आहे. तो एक उत्तम दर्जेटा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. शरदनंच 'बाहुबली' च्या चित्रपटांमध्ये प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला आहे. तर अजय देवगणच्या तान्हाजी चित्रपटात त्यानं काम केलं आहे.
आता शरद केळकरनं 'तुम से तुम तक' या मालिकेतून तब्बल 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. या शोसाठी त्यानं जितकं मानधन घेतलं आहे. त्यामुळे तो छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. 'डीएनए' च्या रिपोर्ट्सनुसार, शरद केळकरला या शोसाठी रोज 3.50 लाख रुपये मानधन मिळणार आहे. जर मालिकेचं शूटिंग महिन्याच्या 30 दिवस होत असेल तर त्या हिशोबानं शरद एका महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावतोय.
शरद केळकरच्या या मालिकेविषयी बोलायचं झालं तर त्याची 'तुम से तुम तक' ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहू शकता. यात शरद केळकरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत निहारिका चौकसे आहे. ही मालिका 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे.
मालिकेची पटकथेविषयी बोलायचं झालं तर एक 40 वर्षांचा माणूस दाखवला असून त्याचं नाव आर्य आहे. तर त्याची अभिनेत्री ही 19 वर्षांची असते तिचं नाव अनु आहे. त्यानंतर दोघांना एकमेकांवर प्रेम होतं. पण जास्त वयाच्या फरकामुळे समाज त्यांना नावं ठेवतं. या मालिकेत हे दाखवलं आहे की वयाचं अंतर, दोन्ही कुटुंब आणि समाजाचा विचार या सगळ्याचा त्यांच्या प्रेमावर कसा परिणाम होतो.