Marathi News> मनोरंजन
Advertisement

अपघातानंतर शाहिद कपूरचं Tweet, झाकावा लागला चेहरा : Video

अपघातानंतरचा पहिला व्हिडिओ समोर 

अपघातानंतर शाहिद कपूरचं Tweet, झाकावा लागला चेहरा : Video

मुंबई : शाहिद कपूरचा नुकताच एक अपघात झाला आहे. आगामी सिनेमा जर्सीच्या शुटिंग दरम्यान त्याचा अपघात झाला. या अपघातात शाहिद जखमी झाला असून त्याच्या ओठाला दुखापत झाली आहे. यामध्ये त्याला ओठाला काही टाके पडले आहेत. 

शाहिदचा अपघातानंतरचा चेहरा पहिल्यांदाच समोर आला आहे. या व्हिडिओत शाहिदने चेहरा लपवला आहे. त्यामुळे नाकापर्यंतचा भाग फक्त उघडा असल्यामुळे त्यामधून शाहिद दिसत आहे. या व्हिडिओत शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत जाताना दिसत आहे. 

तसेच शाहिद कपूरने रविवारी ट्विट देखील केलं आहे. 'तुम्ही दाखवलेल्या प्रेमाकरता धन्यवाद, हो मला काही टाके पडले आहेत. पण या सगळ्यातून मी बरा होत आहे. जर्सीने माझ्यातील थोडं रक्त घेतलं. पण कथा उत्तम असल्यामुळे हरकत नाही.'

२०१८ साली शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळविली. इतकंच नाही तर या चित्रपटानंतर शाहिदची चॉकलेट बॉय ही इमेज बदलून गेली. ‘कबीर सिंग’नंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.

Read More