Marathi News> मनोरंजन
Advertisement

...करीनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

२० सप्टेंबरला मध्यरात्री बाराच्याच ठोक्याला करीनाने बर्थडे केक कापत या दिवसाची सुरुवात केली

...करीनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

मुंबई : बी- टाऊनमध्ये 'बेबो'  म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान हिच्यावर शुभेच्छांचाच वर्षाव होत आहे. निमित्त आहे, ते म्हणजे तिच्या वाढदिवसाचं. आपल्या आयुष्यातील या खास दिवसाचा आनंद करीनाला तर आहेच, पण तिच्या प्रियजनांनीही तिच्या या खास दिवसाला आणखी खास करण्यासाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. २० सप्टेंबरला मध्यरात्री बाराच्याच ठोक्याला करीनाने बर्थडे केक कापत या दिवसाची सुरुवात केली.

fallbacks

करीनाची बहीण करिष्मा कपूर आणि तिच्या इतरही कुटुंबीयांनी सोशल मीडियावर 'बेबो'च्या बर्थडे पार्टीतील काही फोटो पोस्ट केले होते. यावेळी करीनाचा पती, अभिनेता सैफ अली खान, सोहा अली खान, करिष्मा कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबतच बेबोच्या आई- वडिलांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

गेल्या बऱ्याच वर्षांपासून हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या करीनाला चाहत्यांनीही विविध मार्गांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच तिच्या कुटुंबीयांनी केलेलं हे सेलिब्रेशन अर्थातच तिच्यासाठी फार जवळचं आहे हे नाकारता येणार नाही. 

fallbacks

आई, मुलगी, बहीण, पत्नी, अभिनेत्री अशा विविध भूमिका तितक्याच जबाबदारीने आणि मोठ्या आत्मविश्वासाने पेलणाऱ्या करीनासाठी तितक्याच खास पद्धतीचा केक आणण्यात आला होता.

तिच्यासाठी आणलेल्या या केकवर “You are our rockstar” असं लिहिण्यात आलं होतं. अतिशय सुरेख असा हा केक एक प्रकारे करीनाच्या व्यक्तीमत्वाचं प्रतिबिंब होता असंही मत बऱ्याच चाहत्यांनी मांडलं. 

Read More