Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री प्रियाला एकाच दिवशी तब्बल 610 हजार चाहत्यांनी केलं फॉलो

सोशल मीडियाची ताकद अनेकदा आपण अनुभवली आहे. 

अभिनेत्री प्रियाला एकाच दिवशी तब्बल 610 हजार चाहत्यांनी केलं फॉलो

मुंबई : सोशल मीडियाची ताकद अनेकदा आपण अनुभवली आहे. 

सैराट सिनेमापाठोपाठ आता 'उरू अदार लव' हा मल्याळम सिनेमा सध्या आपल्या कलाकार जोडीमुळे सोशल मीडियावर गाजतोय. याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की अवघ्या एका दिवसांत या व्हिडिओने वेगळीच पसंती मिळवली. एवढंच नव्हे तर या दोन्ही कलाकारांच्या फॉलोअर्समध्ये देखील तुफान वाढ झाली आहे. 

प्रिया प्रकार वारिअर आणि रोशन अब्दुल रहूफ असं नाव असलेल्या या जोडीचे अनेक चाहते प्रेमात पडले आहेत. आपल्या नजरेने घायाळ करणारी ही अभिनेत्री अनेक चाहत्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या होम स्क्रिनवर पाहायला मिळते. 

 

Finally, when your best friend buys a good phone @sree_17 

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

प्रियाने रचला अनोखा विक्रम 

या अभिनेत्री या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळाच विक्रम रचला आहे. 

1) अवघ्या एका दिवसांत या अभिनेत्रीला 610 हजार लोकांनी इंस्टाग्रामवर फॉलो केलं आहे. 
2) ही अभिनेत्री तिसऱ्या नंबरवर आहे जिला एवढ्या कमी वेळात चाहत्यांनी फॉलो केलं 

 

I do the thing called what i want

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

3)KYLIE JENNER या अभिनेत्रीला एका दिवसांत (5 फेब्रुवारी 2018) 860 हजार चाहत्यांनी फॉलो केलं 
4) तर Cristiano Ronaldo या फूटबॉलरला 13 नोव्हेंबर 2017 रोजी 650 हजार चाहत्यांनी फॉलो केलं 

 

 

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटात तिला एका छोट्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं. पण, कालांतराने अभिनय कौशल्य पाहून मुख्य भूमिकेसाठी तिची वर्णी लागली आणि त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहेतच. त्यामुळे प्रियाच्या वाट्याला आलेल्या या संधीचं तिने खऱ्या अर्थाने सोनं केलं असंच म्हणावं लागेल कारण ही संधी तिला मिळाली नसती तर, आज प्रिया ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे, तसं काही होण्याची शक्यताही नसती.

Read More