Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमारच्या 'ड्युप्लिकेट'चे फोटो व्हाय़रल

नेटकरी काय म्हणात आहेत पाहिलं का? 

अक्षय कुमारच्या 'ड्युप्लिकेट'चे फोटो व्हाय़रल

मुंबई :  सोशल मीडियाच्याच निमित्ताने कलाविश्वात आता एका नव्या चर्चेने जोर धरला आहे. कोलकात्याच्या रानू मंडल यांच्याविषयीच्या चर्चा शमत नाहीत, तोच आता लक्ष वेधलं आहे ते म्हणजे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याप्रमाणेच अगदी हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने. सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा फोटो पोस्ट करतात, नेटकऱ्यांनी बी- टाऊन सेलिब्रिटीच्या आणि त्यांच्या चेहऱ्यातील साम्य हेरलं आणि बस्स... मग काय, चर्चांना उधाण आलं. 

वृत्तवाहिनीतील एका पत्रकाराने सोशल मीडिया साईटवर या व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये मुळचे काश्मीरमधील असणारे ते गृहस्थ सुनील गावस्कर या क्रिकेटपटूचे चाहते असल्याचं म्हटलं आहे. गावस्कर यांच्याप्रमाणेच क्रिकेट खेळताना वापरली जाणारी गोल किनार असणारी टोपीही ते दररोज वापरतात. त्यांचं नाव आहे माजिद मिर. 

माजिद यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच, 'अरे, हा तर खिलाडी कुमार....' असं म्हणत काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी अक्षयच्या बायोपिकमध्ये यांनाच भूमिका देणं उत्तम असेल अशीही प्रतिक्रिया दिली. हे तर खिलाडी कुमारचं वयोवृद्ध व्हर्जन असं म्हणत उतारवयात अक्षय काहीसा असाच दिसेल, अशाची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. 

fallbacks

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अक्षयपर्यंत हा फोटो पोहोचणार हे नक्की. पण, आता यावर त्याची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणंही तितकंच औत्सुक्याच ठरणार आहे. तणावग्रस्त परिस्थितीच्या बातम्या येणाऱ्या काश्मीरमधून आलेली ही बातमीही अनेकांचंच लक्ष लेधत आहे. 

fallbacks

fallbacks

एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे चेहऱ्याच साम्य असणाऱ्या व्यक्ती प्रकाशझोतात येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अभिनेत्री अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आणि इतरही कलाकारांच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते व्यक्ती प्रकाशझोतात आले होते. 

Read More