Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bigg Boss फेम Vikas Gupta चा इंटीमेट व्हिडिओ व्हायरल

विकासच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती आहे तरी कोण?

Bigg Boss फेम Vikas Gupta चा इंटीमेट व्हिडिओ व्हायरल

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) आणि 'बिग बॉस 11' (Bigg Boss 11) चा स्पर्धक विकास गुप्ता   (Vikas Gupta) कायम चर्चेत असतो. विकास चांगल्या कारणांमुळे नाही तर वादग्रस्त कृतींमुळे अधिक चर्चेत असतो. त्याला टीव्ही विश्वाचा 'कॉन्ट्रोवर्सी किंग' म्हणून ओळखला जातो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे तो तुफान चर्चेत आला आहे.  व्हिडिओमध्ये तो एका मुलीसोबत दिसत आहे. अशात अनेक जण विकासला ती मुलगी कोण आहे असा प्रश्न विचारत आहेत. 

विकास गुप्ताच्या रोमांटिक व्हिडिओमध्ये विकार चेतना पांडे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो चेतनाच्या मागे बसला आहे. चेतना पांडे टीव्ही अभिनेत्री आहे. चेतना आणि विकास चांगले मित्र आहेत. दोघे कायम एकमेकांसोबत व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. चेतनासोबत  व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'अशा व्यक्तीसाठी पुढे जा, ज्यावर तुम्ही प्रेम करता...'

विकास चेतनासोबत झाला रोमांटिक
काही दिवसांपूर्वी विकास गुप्ता आणि चेतना पांडे यांच्या अफेअरची बातमी समोर आली होती, ज्यावर दोघांनीही दोघे चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. तसे, विकास गुप्ता अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. 'बिग बॉस'च्या घरातही त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. घराबाहेर पडल्यानंतरही तो बिनधास्तपणे आयुष्याबद्दल सांगत असतो.

Read More