Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाला 24 तास उलटेना, त्याआधीच आयरा खान आणि नुपूरच्या बेडरुममधील फोटो समोर

Ira khan Nupur Shikhare Bedroom Phooto: आयरा आणि नुपूर दोघांचे ३ जानेवारीला लग्न झाले. या लग्नसोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नाला 24 तास उलटेना, त्याआधीच आयरा खान आणि नुपूरच्या बेडरुममधील फोटो समोर

Ira khan Nupur Shikhare Bedroom Phooto: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान अखेर मिसेस बनली आहे. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत सर्वांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. दोघांचे ३ जानेवारीला लग्न झाले. या लग्नसोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान लग्नाला 24 तास उलटेना तोपर्यंत आयरा आणि नुपूरचा आणखी एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.

आयराने लग्नानंतरचा तिचा पहिला सेल्फी शेअर केला आहे. या फोटोत ती पती नुपूरसोबत बेडरूममध्ये आहे. नुपूरही आपल्या पत्नीला पोज देण्यात पूर्ण साथ देताना दिसतोय. आयरा खानने पती नुपूर शिखरेसोबतचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिने एक बँड देखील घातला होता ज्यावर 'ब्राइड टू बी' लिहिलेले होते. पण तिने 'टू बी' लिहिलेल्या शब्दावर रेष ओढली आहे. आपण आता नुपूरची वधू झालो आहोत, हे तिने यातून दाखवून दिले आहे.  नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. तो अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे जिम ट्रेनरही राहिला आहे. आयरा आणि त्याची पहिली भेट जिममध्येच झाली होती. 2020 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

लग्नाचे फोटो व्हायरल 

आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषत: नुपूर लग्नस्थळी पोहोचण्याआधी 8 किलोमीटर धावला. त्याने जिमच्या कपड्यांमध्ये आयराशी लग्न केले. यावर काही यूजर्स त्याची खिल्लीही उडवत आहे. खुद्द आमिर खानने आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींचे लग्नात स्वागत केले. या कार्यक्रमात त्यांच्या दोन्ही एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता देखील उपस्थित होत्या. त्यांची मुले जुनैद आणि आझाद देखील उपस्थित होते.

fallbacks

अचानक किरणला किस

चर्चेत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान किरण रावकडे चालत येता दिसतो. किरण ही लेक आझादच्या बाजूला उभी असते. आमिर तिच्याशी काहीतरी बोलतो. संपूर्ण ग्रुप फोटोसाठी पोज देत असतानाच अचानक आमीर बोलता बोलता किरणला किस करतो. आमीर ओंजळीत किरणचा चेहरा पकडून गालावर किस घेताना दिसतो. किरणच्या गालावर किस केल्यानंतर आमीर तिथून निघून जातो आणि फोटोसाठी पोज देत इरा आणि नुपूरच्या मागे उभा राहतो. आमीर खान फोटोसाठी पोज देताना किरणलाही फोटोमध्ये ये असं सांगताना दिसतो.

कोणी काय परिधान केलेलं?

आमीर खानने लेकीच्या लग्नामध्ये क्रिम कलरची शेरवानी आणि गुलाबी फेटा घातला होता. आमीरची पहिली पत्नी रिना दत्ताने पांढऱ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे परिधान केलेले. किरण रावने गोल्डन आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. इराने डीप कट असलेली चोळी त्याखाली निळ्या, गुलाबी रंगाची धोती पॅण्ट घातली होती. इराने चंदेरी रंगाचा दुपट्टा तिच्या डोक्यावरुन घेतला होता. नुपूरने निळ्या रंगाचा बंदगळा सूट घातला होता. मात्र त्यांच्या कपड्यांपेक्षा आमिरने किरणला केलेला किस अधिक चर्चेत आहे.

10 दिवस चालणार लग्नसोहळा

इरा आणि नुपूर हे बुधवारी नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर ते दोघेही उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं सांगितलं जात आहे. उदयपूरमध्ये लग्नाचे विधी, संगीत, हळद हे सभारंभ होतील, अशी माहिती समोर येत आहे. बुधवारपासून सुरु झालेला हा सोहळा पुढील 10 दिवस चालणार आहे. लग्नाच्या कार्यक्रमांना 3 जानेवारीपासून सुरुवात झाली असून हे कार्यक्रम 13 जानेवारीपर्यंत चालतील. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत 13 जानेवारीला एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read More