Marathi News> मनोरंजन
Advertisement

चिमुकल्या 'पठाण'लाही सलमानच्या लकी ब्रेसलेटची भूरळ !

अभिनेता सलमान खान आणि त्याचं लहान मुलांवरील प्रेम, त्यांच्यांत रमणं हे सारंच अनेकदा त्याच्या चाहत्यांनी पाहिलं असेल. 

चिमुकल्या 'पठाण'लाही सलमानच्या लकी ब्रेसलेटची भूरळ !

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याचं लहान मुलांवरील प्रेम, त्यांच्यांत रमणं हे सारंच अनेकदा त्याच्या चाहत्यांनी पाहिलं असेल. सलमान खान त्याच्या भावडांच्या मुलांशीही खास वेळ काढून खेळतो. काल मुंबईत वानखेडे स्टेडियमवरही सलमान खान इरफान पठाणच्या मुलाशी खेळताना दिसला. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या खास शोमध्ये 'रेस 3' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर सोबत सलमान खान पोहचला होता. त्यावेळेस इरफान पठाण सोबत दोघांनी कॉमेंट्रीदेखील केली.  

चिमुकल्या पठाणसोबत खेळत होता सलमान 

सलमान खान इरफान पठाणच्या मुलासोबत खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये इरफान पठाणचा मुलगा ब्रेसलेटसोबत खेळताना दिसला. 

 

रेस 3 ईदला होणार रीलिज  

रेस 3 हा सलमान खानचा चित्रपट 15 जूनला ईदच्या मुहुर्तावर रीलीज होणार आहे. रेसच्या पहिल्या दोन भागांमध्ये प्रमुख भूमिका सैफने साकारली होती. मात्र तिसर्‍या भागात सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडीस, डेजी शहा, सकीब सलीम, अनिल कपूर, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट आहे. 

Read More