आता तो बॉलीवुड नाही तर हॉलीवुड सिनेमात दिसणार आहे. Puzzle असे या सिनेममाचे नाव आहे.
मुंबई : बॉलीवुडसोबत हॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्यांपैकी इरफान खान एक आहे. उपचारासाठी सध्या त्याने अभिनयापासून ब्रेक घेतलाय. पण तो सलग स्क्रीनवर दिसत असतो. आता तो बॉलीवुड नाही तर हॉलीवुड सिनेमात दिसणार आहे. Puzzle असे या सिनेममाचे नाव आहे.
Puzzle चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. यामध्ये इरफान एक चॅम्पियन पजल सॉल्वरच्या भुमिकेत दिसणार आहे. 'न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर' त्रस्त असलेल्या इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत.
मोठी कमाई
दरम्यान इरफान आणि सबा कमरची मुख्य भुमिका असलेला 'हिंदी मिडियम' सध्या चीनच्या बॉक्स ऑफिसवर धम्माल करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने २०५.२१ कोटी रुपयांची कमाई केलीय.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.