Marathi News> मनोरंजन
Advertisement

PIC : लंडनमध्ये उपचार घेणाऱ्या इरफान खानने शेअर केला फोटो

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा आजार झाला आहे. 

PIC : लंडनमध्ये उपचार घेणाऱ्या इरफान खानने शेअर केला फोटो

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा आजार झाला आहे. 

हा ट्यूमर शरिरातील कोणत्याही भागात पसरू शकतो. इरफान आपल्या या आजाराच्या उपचाराकरता लंडनमध्ये गेला आहे. 

काहीच वेळा पूर्वी इरफान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरू हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने एक अर्थपूर्ण कविता लिहिली आहे. 

या कवितेत इरफान खानने देव आणि आयुष्य यावर भाष्य केलं आहे. त्याने यामध्ये लिहिलं आहे की, देव आपल्यासोबत अगदी शांतपणे चालत असतो. आणि खूप लहान आवाजात तो आपल्याशी संवाद साधत असतो. आपण त्याच्या सावलीत चालत असतो. आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते घडू द्याव. कारण कोणतीच भावना ही शेवटची नसते. आपल्याजवळ एकच जागा आहे ज्याला आयुष्य म्हणतात.  

इरफान खान विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमांत आपल्याला पाहायला मिळणार होता. मात्र त्याचवेळी इरफान खानच्या आजाराबाबत माहिती मिळाली. त्यामुळे उपचाराकरता इरफान तातडीने लंडनला निघून गेला.

तेव्हा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आपल्या सिनेमाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. विशाल म्हणाले की, इरफान खानच्या येण्यानंतर आपण या सिनेमाचं शुटिंग सुरू करणार आहोत. 

Read More