Marathi News> मनोरंजन
Advertisement

घरच्या मंडळींकडून अंकिताची ओटी भरणी, Good News ऐकताच पाहा कशी होती तिची प्रतिक्रिया

 नव्या घरात प्रवेश करण्यापासून ते अगदी पहिल्या संक्रांता थाट दाखवण्यापर्यंत प्रत्येक वेळी अंकितानं तिच्या खासगी आयुष्यातील क्षण सर्वांशी शेअर केले.   

घरच्या मंडळींकडून अंकिताची ओटी भरणी, Good News ऐकताच पाहा कशी होती तिची प्रतिक्रिया

मुंबईः काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिनं तिचा प्रियकर विकी जैन याच्याशी लग्नगाठ बांधली. अतिशय दिमाखदार अशा सोहळ्यात अंकिता आणि विकीचा लग्नसोहळा पार पडला. ज्यानंतर तिनं वैवाहिक आयुष्यात डोकावण्याची संधी तिच्या चाहत्यांना दिली. 

सोशल मीडियाचा आधार तिनं यासाठी घेतला. नव्या घरात प्रवेश करण्यापासून ते अगदी पहिल्या संक्रांता थाट दाखवण्यापर्यंत प्रत्येक वेळी अंकितानं तिच्या खासगी आयुष्यातील क्षण सर्वांशी शेअर केले. 

आता जेव्हा ती सासरच्या घरी पोहोचली आहे, तेव्हा तिथेही तिचं खास अंदाजात स्वागत करण्यात आलं. 

सासूबाई आणि जावेनं तिची ओटीही भरली. पण, अंकिताची ओटी भरत असतानाच सासुबाईंनी तिच्याकडे एक मागणंही मागितलं. 

दुधो नहाओ, पुतो फलो.... असं म्हणत त्यांनी पुढे लवकरच आम्हाला गोड बातमी दे, असंही मागणं तिच्याकडे मागितलं. 

हे ऐकून अंकितानं हे ऐकताच मजेशीर प्रतिक्रिया दिली. आपल्याला धक्का बसल्याप्रमाणं तिनं भुवया उंचावल्या आणि क्षणातच खळखळून हसली. 

यावेळी तिथं असणारी तिची जाऊसुद्धा आनंदातच दिसली. 

हा व्हिडीओ आणि तिची पोस्ट पाहता सासरच्यांसोबत असणारं अंकिताचं नातं सर्वांसमोर आलं. 

इतकंच नव्हे, तर तिची ओटी भरली जात असल्याचं पाहत खरंच ती गरोदर आहे की काय असे प्रश्नही चाहत्यांनी मजेशीर अंदाजात विचारले. 

Read More