Is Sreeleela Getting Married : गेल्या वर्षी 2024 मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा 2' या चित्रपटातील एका गाण्यातून रात्रीत स्टार होणार आहे. श्रीलीलानं नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहुन तिचे चाहते हे गोंधळले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ती लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. श्रीलीलानं शेअर केलेल्या फोटोमध्ये हळदीचा कार्यक्रमा असल्याचं दिसत आहे. श्रीलीलानं निळ्या आणि क्रीम रंगाची साडी नेसली आणि ट्रेडिशनल ज्वेलरी परिधान केली आहे.
श्रीलीलानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केले आहेत. या लूकमध्ये श्रीलीला ही खूप सुंदर दिसत आहे. तिच्या विना मेकअप लूकनं सगळ्यांना वेड लावलं आहे. त्यात तिनं मांगटीका लावला असून त्यामुळे तिचं सौंदर्य हे खुलून आलं आहे. या फोटोंमध्ये श्रीलीला हसते आणि या सगळ्या क्षणांचा आनंद घेत असल्याचे दिसते. श्रीलीलाला कोणी हळद लावताना दिसतं. तर कोणी तिला कुंकू लावताना दिसतंय. तर आणखी एका स्टोरीमध्ये श्रीलीला तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत दिसत आहे. खरंतर श्रीलीलानं ही पोस्ट रिशेअर केली आहे. ओरिजनल स्टोरी शेअर करत तिच्या मेकअप आर्टिस्टनं कॅप्शन दिलं होतं की श्रीलीलाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे.
या सगळ्यात जर कोणत्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असेल तर ते तिच्या कपाळी असलेल्या सिंदूर आणि लाल बिंदीनं. त्याचं कारण म्हणजे आपल्या देशात लग्न झालेल्या महिला या लग्न झालेल्या असतील त्याच लावतात. तर अनेक लोकं म्हणतं होते की ती लग्न बंधनात अडकणार असेल. दुसरीकडे फोटोंमध्ये श्रीलीला गुलाबी कपड्यांमध्ये सुंदर दिसते. तर तिच्यासोबत हे तिचं कुटुंब आहे असं अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या फोटोंमध्ये एक ताट आहे आणि त्यात हळद, कुंकू आणि पान आहे. या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यपणे लग्नाशी संबंधी आहे.
हेही वाचा : 'त्यानं पॅन्टमधून काही बाहेर काढलं आणि...', Surveen Chawla नं सांगितला बालपणीचा 'तो' धक्कादायक किस्सा
त्यामुळे लोकं विचार करू लागले की श्रीलीला ही साखरपुडा करणार असेल. आता पर्यंत श्रीलीलाकडून याविषयी काही माहिती समोर आलेली नाही. फक्त सोशल मीडियावरून लोकं हे सगळं बोलत आहेत. दरम्यान, श्रीलीला ही लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'आशिकी 3' या चित्रपटात दिसणार आहे.