Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनिल कपूर यांच्यासोबत काय झालं?; 'बाबा??!' म्हणत सोनमनं शेअर केली पोस्ट

Anil Kapoor Instagram Hacked: सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांचे अकांऊट हे हॅक झाल्याचे दिसून येते आहे. यावेळी त्यांच्या या फोटोची बरीच चर्चा रंगलेली आहे. 

अनिल कपूर यांच्यासोबत काय झालं?; 'बाबा??!' म्हणत सोनमनं शेअर केली पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांचे सोशल मीडिया अकांऊट म्हणजेच इन्स्टग्राम अकांऊट हे हॅक झालं आहे. त्यामुळे सध्या अनिल कपूर यांचे चाहतेही काळजी पडले आहेत. यावेळी अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिनं आपल्या इन्टाग्रामवरून एक स्टोरी शेअर केली आहे. ज्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तुम्ही या स्टोरीमध्ये पाहू शकता की, अनिल कपूर यांच्या अकांऊटवरून सर्व फोटो हे डिलिट झाले आहेत. त्यामुळे त्यांची लाडकी लेकही काळजी पडली आहे. Dad??! असं कॅप्शन तिनं हा फोटो टाकत शेअर केला आहे. आपण अनिल कपूर यांचा मिस्टर इंडिया हा चित्रपट पाहिला असेलच. त्यात ते गायब होतात. आता असाच काहीसा प्रकार हा त्यांच्यासोबत घडला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 

यावेळी त्यांचे इन्टाग्राम अकांऊट हे पुर्णपणे हॅक झाले आहे. असे दिसून येते आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली आहे. यावेळी त्यांचे सर्व फोटो हे डिलिट झाले आहेत. त्यातून त्यांचा प्रोफाईल फोटोही डिलिट झाला आहे. यावेळी त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनाही काळजी वाटू लागली आहे. यावेळी सोनम कपूरनंही याबाबत त्यांच्या अकांऊटचा स्क्रीनशॉट हा शेअर केला आहे. ज्यात हे स्पष्टपणे दिसते आहे. नक्की त्यांचे अकांऊट हे हॅक झाले आहे का की अजून काही याबद्दल अद्यापही काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पण जरा का तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की, त्यांचे प्रोफाईल फोटो हे त्यांच्या मिस्टर इंडियाच्या लुकप्रमाणे वाटते आहे. त्यांचा जॅकेट, टॉपी हा लुक. त्यामुळे काही प्रमोशन स्ट्रॅटजी आहे का अशीही सर्वांना शंका वाटू लागली आहे. 

परंतु यातलं नक्की काय खरं आहे हे चाहत्यांसमोर लवकरच येईल. 

fallbacks

अनिल कपूर आणि रिया कपूर यांनी प्रोड्यूस केलेला Thank You For Coming हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. हा चित्रपट टोरांटो फिल्म फेस्टिवललाही पोहचला होता. त्यामुळे या चित्रपटाची तूफान चर्चा होती. सध्या सोनम कपूर आणि अनिल कपूर हे दोघंही टायगर श्रॉफ आणि क्रिती सननच्या 'गनपथ : अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी एकत्र दिसले होते. आता अनिल कपूर लवकरच संजय रेड्डी यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटातून दिसणार आहेत. यावेळी ते रणबीर कपूरच्या वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत. यावेळी तृप्ती डिमरी, बॉबी देओल आणि रश्मिका मंदानाही या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतील. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचसोबत फाईटर या दीपिका पादूकोण आणि हृतिक रोशनच्या चित्रपटातूनही ते दिसणार आहेत. 

Read More