Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्का शर्माच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीवर शिक्कामोर्तब? व्हायरल VIDEO वरून चर्चांना उधाण

Anushka Sharma Pregnancy Rumors: सध्या अनुष्का शर्मा हिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काही दिवसांपुर्वीच ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा रंगलेली होती. यावेळीही एका व्हायरल व्हिडीओवरून त्यांची चर्चा रंगलेली आहे. 

अनुष्का शर्माच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीवर शिक्कामोर्तब? व्हायरल VIDEO वरून चर्चांना उधाण

Anushka Sharma Pregnancy Rumors: सध्या अनुष्का शर्माची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा प्रेगंन्ट आहे का याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काही दिवसांपुर्वी तिच्या या बातम्यांनी सोशल मीडियावर जोरात चर्चा पिकवली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. काल भारत पाकिस्तान मॅच होती ज्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र विजयाचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. यावेळी अनुष्का शर्मानंही अहमदाबादमध्ये IND vs PAK मॅचच्या दरम्यान हजेरी लावलेली होती. त्यामुळे तिचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यावरून तिच्या प्रेग्नंन्सीची परत एकदा चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अनुष्का शर्मा ही यावेळी विराट कोहलीसोबत दिसली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. 

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ तितकासा स्पष्ट नाही. यात अनुष्का बेबी बंप कॅरी करताना दिसते आहे. त्यामुळे ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडीओ कालच्या मॅचचा म्हणजेच अहमदाबादचाच असावा कारण यावेळी तिनं जो ड्रेस परिधान केला आहे तो तिनं काल मॅचच्या वेळीही परिधान केला होता. सध्या याची तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. यावेळी पुढे विराट कोहली आहे आणि मागून अनुष्का शर्मा दिसते आहे. 

हेही वाचा : कसलं भारी! रवी जाधव यांनी विकत घेतली इकोफ्रेंडली कार... पाहा किती आहे किंमत

2020 मध्ये अनुष्का शर्मानं आपली पहिल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. तेव्हा तिनं आपल्यासोबत विराटचाही एक गोड फोटो हा शेअर केला होता. त्यामुळे याची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी तिनं पांढऱ्या पोलका डॉटचा काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावरून बरेच मीम्स हे व्हायरल झाले होते. त्यात एक मीम तर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात एक प्रसंग आहे. ज्यात पार्वतीला घराच्या मालकीणबाई पुत्रप्राप्तीसाठी आंबा घायला देतात. @MoinulHuda7 नावाच्या युझरनं हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. 

तेव्हा अनुष्काच्या याच ड्रेसवरून पार्वतीचं मीम तयार केले होते. जे जोरात व्हायरल झाले होते. त्यानंतर 2021 मध्ये वामिकाचा जन्म झाला होता. आता वामिका ही दोन वर्षांची झाली आहे. परंतु अद्यापही अनुष्कानं तिचा फोटो हा दाखवलेला नाही. मध्यंतरी तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Read More