Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिला घटस्फोट, मग ब्रेकअप... आता सुष्मिता सेनच्या लेकीला डेट करतोय बिग बॉस विजेता?

Sushmita Sen's Daughter : सुष्मिता सेनच्या लेकीसोबत स्पॉट झाला 'बिग बॉस' विजेता, तर सोशल मीडियावर सुरु झाल्या डेटिंगच्या चर्चा

पहिला घटस्फोट, मग ब्रेकअप... आता सुष्मिता सेनच्या लेकीला डेट करतोय बिग बॉस विजेता?

Sushmita Sen's Daughter : स्टारकिड्सची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. आजकाल काही कलाकार आहेत ज्यांची लोकप्रियता ही काही सेलिब्रिटिंपेक्षा देखील जास्त आहे. त्यापैकी एक म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनची लेक रेने. रेने ही सोशल मीडिया आणि इतर अनेक गोष्टींपासून लांब असली तरी देखील ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सध्या तिचं चर्चेत येण्याचं कारण हे ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर आहे. मुनव्वर आणि रेने एकत्र स्पॉट झाले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

मुनव्वर आणि रेनेचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इंस्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. मुनव्वर आणि रेने एका गाडीतून एका पार्टीत पोहोचले होते. त्यावेळी रेनेनं पीच रंगाचं स्ट्रॅपी क्रॉप टॉप परिधान केलं असून त्यासोबत डेनिम जीन्स परिधान केली आहे. तर दुसरीकडे मुनव्वरनं देखील क्रिम रंगाचं जॅकेट आणि ट्रॅक परिधान केली आहे. त्यांच्यासोबत ऑरी देखील दिसत आहे. दरम्यान, सगळ्यांचं लक्ष हे मुनव्वर आणि रेनेनं वेधलं आहे. त्या दोघांना एका गाडीतून उतरताना पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या दोघांनी एकत्र एन्ट्री केली तरी देखील त्यांनी एकत्र फोटोसाठी पोज दिली नाही. मात्र, ते चर्चेचा विषय नक्कीच ठरले आहेत. मात्र, त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुष्मिताच्या लेकीविषयी आणि मुनव्वरवर कमेंट देखील केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की 'सुष्मिता सेनची लेक त्याच्यासोबत काय करते?' दुसरा नेटकरी म्हणाला की 'सुष्मिताच्या लेकीला नक्की काय झालं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'ती नक्की रेनेच आहे ना? सुष्मिता सेनची मुलगी?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'सुष्मिता सेनची लेक त्यांच्यासोबत काय करते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आजकाल अशाच मुलांचा काळ आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अशा धोका देणाऱ्या व्यक्तीसोबत सुष्मिता सेनची लेक काय करते?' 

हेही वाचा : 'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य

रेनेविषयी बोलायचे झाले तर तिनं 2021 मध्ये सुट्टाबाजी या शॉर्ट फिल्ममधून करिअरची सुरुवात केली. त्याशिवाय 'ताली' या सीरिजमध्ये असलेल्या महामृत्युंजय मंत्र देखील तिनं म्हटला आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याविषयी वोग इंडियाशी बोलताना रेनेनं म्हटलं की मी इंडस्ट्रीमध्ये स्वत: माझं स्थान निर्माण करणार आहे. 

Read More