Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर 'ड्युरेक्स'च्या जाहिरातीतून रणवीरचा काढता पाय?

चित्रपटांसोबतच विविध जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग याने एक महत्त्वाच निर्णय घेतल्याचं कळत आहे.

लग्नानंतर 'ड्युरेक्स'च्या जाहिरातीतून रणवीरचा काढता पाय?

मुंबई : चित्रपटांसोबतच विविध जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग याने एक महत्त्वाच निर्णय घेतल्याचं कळत आहे. 'फोर्ब्स इंडिया'ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणवीरने 'ड्युरेक्स'च्या जाहिरातींतून काढता पाय घेतल्याचं कळत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून या ब्रँडशी संलग्न असणाऱ्या रणवीरने हा निर्णय त्याच्या लग्नामुळे घेतला असल्याचंही म्हटलं जात आहे. 

रणवीर आणि या ब्रँडमध्ये सुरु असणारी चर्चा ही यशस्वी झाली नाही. परिणामी त्यांच्यातील करार हा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला याविषयीच्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. रणवीर सिंग Durex condomच्या जाहिरातींमुळेही बराच प्रकाशझोतात आला होता. 

मुख्य म्हणजे तो या ब्रँडशी जोडला गेलेला असताना 'Do The Rex' ही टॅगलाईनही बरीच चर्चेत होती. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नानंतरही या ड्युरेक्सकडून त्यांना लक्षवेधी पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. पण, यापुढे रणवीर ड्युरेक्सच्या जाहिरातीत झळकणार नसल्याचंच स्पष्ट होत आहे. 

जाहिरातीतून काढता पाय घेण्याविषयी रणवीरकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला तो '८३' या आगामी चित्रपटाच्या तयारीवर लक्ष केंद्रीत करत आहे. कबीर खान, दिग्दर्शित या चित्रपटातून रणवीर माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. १९८३ मधील क्रिकेट विश्वचषक जिंकण्याच्या भारतीय संघाच्या उल्लेखनीय कामगिरीवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटातील भूमिकेसाठीच रणवीर आणि इतर कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असल्याची माहिती मिळत आहे. 

 

Read More