Marathi News> मनोरंजन
Advertisement

क्रिकेटर के.एल राहुलचं सुनील शेट्टीच्या मुलीसोबत डेटिंग?

के.एल राहुल 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?

क्रिकेटर के.एल राहुलचं सुनील शेट्टीच्या मुलीसोबत डेटिंग?

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं फार जुनं नात आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर लग्नबंधनातही अडकले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा बॉलिवूड आणि क्रिकेटचं नवं लव्ह कनेक्शन पाहायला मिळतंय. अभिनेते सुनिल शेट्टी यांची मुलगी आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल राहुल ही जोडी त्यांच्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे.

आथिया शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर केली. त्या पोस्टवर फॅशन डिझायनर विक्रम फडनीस यांनी केलेली कमेंट या दोघांच्या नात्याबाबतची हिन्ट असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

 
 
 
 

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

 
 
 
 

A post shared by KL Rahul (@rahulkl) on

'Trust The Timing of your Life'अशी पोस्ट आथियाने केली. त्यावर विक्रम यांनी कमेंट करत, 'तू सध्या अतिशय उत्साहित वाटत आहे? के. एल जाऊया?...कुआलांपुर ???' विक्रम यांच्या या कमेंटवर आथियाने, 'तुम्हाला ब्लॉक करावं लागेल' अशी कमेंट केली. 

fallbacks

विक्रम फडनीस यांच्या कमेंटनंतर अनेक चाहत्यांकडून आथिया आणि के. एल. राहुल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अनेक चाहत्यांनी आथियाला याबाबत शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे आता हे दोघेही त्यांच्या नात्याची कबुली देणार का? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

Read More