Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंगला सुपरस्टार बनवण्यामागे नवाजुद्दीन सिद्दीकीचा हाथ?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला सुपरस्टार बनवण्यामागे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा हाथ आहे का? जाणून घ्या सविस्तर 

रणवीर सिंगला सुपरस्टार बनवण्यामागे नवाजुद्दीन सिद्दीकीचा हाथ?

Ranveer Singh : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना सुपरस्टार बनवण्यामागे कोणत्या ना कोणत्या कलाकाराचा हाथ आहे. बॉलिवूड कलाकार आणि चित्रपटांशी संबंधित अशी काही गुपिते आहेत, जी अजूनही उघड होण्यास वेळ लागत आहे. अशातच आता रणवीर सिंगला सुपरस्टार बनवण्यामागे कोणाचा हाथ होता याबाबत एका अभिनेत्याने खुलासा केला आहे. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने एक मोठा खुलासा केला. जो ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. 

नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या 'कोस्टाओ' चित्रपटामुळे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ तो सिनेसृष्टीत काम करत आहे. अभिनेत्याने अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. अशातच अभिनेत्याने रणवीर सिंगला पदार्पणाच्या वेळी प्रशिक्षण देण्याबद्दल खुलासा केला आहे. 

रणवीरला सुपरस्टार बनवण्यामागे नवाजुद्दीन सिद्दीकीचा हाथ?

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने रणवीर सिंगला त्याच्या पहिल्या चित्रपट 'बँड बाजा बारात' साठी प्रशिक्षण देण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. मात्र, त्याचे श्रेय देखील घेण्यास नकार दिला आहे. कारण त्याने सांगितले की, अभिनय हा कधीच शिकवता येत नाही. जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकीला रणवीर सिंगला प्रशिक्षण देण्याबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले की, मी काही काळ ते केले. पण अभिनेत्याने त्या काळाची आठवण सांगताना पुढे सांगितले की, त्यांने कधी कल्पनाही केली नव्हती की दोन वर्षांनी ते 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात काम करतील. 

अभिनेत्याने कधीच असा विचार केला नव्हता तो एक प्रकारचा वर्कशॉपर बनेल. जर कोणाला अभिनेता व्हायचे असेल किंवा लाँच करायचे असेल तर मी तो असतो. आम्ही सर्व कलाकारांसोबत वर्कशॉप करायचो. रणवीर सिंगला सुपरस्टार बनवण्याचे श्रेय घेणार का असा प्रश्न विचारला असता अभिनेता म्हणाला की, अभिनय कधीच शिकवता येत नाही. त्याचे कोणतेही पॅकेज नसते. तुम्हाला स्वतःला शोधून काढावे लागते. रणवीर सिंगकडे स्वतःची क्षमता होती. फक्त तुम्हाला असे दाखवता येते की तुम्ही या मार्गाने देखील जाऊ शकता. परंतु तुम्हाला त्या मार्गावर स्वतःलाच जावे लागते.

Read More