Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिनाच्या लग्नानंतर Salman Khan मुंबईला परतला, व्हिडिओ व्हायरल?

दोघांनीही सगळ्यांपासून लपवून

 कतरिनाच्या लग्नानंतर Salman Khan मुंबईला परतला, व्हिडिओ व्हायरल?

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. अखेर दोघांनी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये त्यांनी सातफेरे घेतले आहेत

दोघांनीही सगळ्यांपासून लपवून, तसेच कमी आणि महत्वाच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नं केलं. त्यांच्या लग्नात पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नव्हती.

तसेच कोणत्याही परिस्थितीत लोकांना सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लग्नातील कित्येक फोटो हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. कतरिनाच्या लग्नाची सर्व सुरक्षेचे जबाबदारी सलमान खानने आपल्या जवळच्या व्यक्तीवर सोपवल्याचं बोललं जात होतं. सलमानचा बॉडीगार्ड शेरा यांच्या टीमनं ही जबाबदारी सांभाळली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कतरिनाच्या अगदी जवळ असणारा सलमान लग्नाला हजेरी लावणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. त्यात 9 डिसेंबर रोजी सलमान देखील एअरपोर्टवर दिसून आला होता. त्यामुळे भाईजान लग्नाला जाणार असल्याची बातमी समोर आली होती.

fallbacks

त्यानंतर नुकताच सलमान मुंबईत परतला आहे. त्याचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आला आहे. पण सलमान खान कतरिनाच्या लग्नाला नव्हे, तर सौदी अरेबिया येथे दबंग टूर रिलोडेड कॉन्सर्टसाठी पोहोचला होता. 

fallbacks

सलमान त्यांच्यावर बनत असलेला मीम्समुळे देखील चर्चेत आहे. कतरिनाच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासूनच सलमान खानवर अनेक मीम्स बनत आहे. 

Read More