Aamir Khan Last Movie : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर लवकरच आमिर खानचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यात आमिर हा सध्या त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान, त्यानं एक खुलासा केला आहे की या चित्रपटानंतर तो त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' यावर काम सुरु करणार आहे. आमिरनं इशारा केला की हा प्रोजेक्ट इतका मोठा होऊ शकतो की तो त्याच्या करिअरचा सगळ्यात शेवटचा चित्रपट देखील असू शकतो.
त्यानं म्हटलं की ही कथा मनाला भिडणारी आहे. यात खूप भावना आहेत आणि त्याचं स्केल खूप मोठं आहे. राजा शमानीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खाननं याविषयी सांगितलं. आमिर म्हणाला, "यात प्रत्येक ती गोष्ट आहे जी जगात आहे. भावना, स्केल, लेयर्स. 'महाभारत' एक अशी गोष्ट आहे जी माझ्या मनात कायम राहिली आहे. ही तिच गोष्ट आहे जी मला मोठ्या पडद्यावर आणायची आहे आणि माझं ते स्वप्न आहे." आमिरच्या म्हणण्यानुसार, या प्रोजेक्टला बनवण्याचं स्वप्न हे खूप जुनं आहे आणि आता वेळ आली आहे की ते स्वप्न पूर्ण करायलाच हव.
पुढे जेव्हा आमिरला विचारण्यात आलं की हा चित्रपट त्याचा अखेरचा चित्रपट असेल का? तर आमिरनं सांगितलं, "अशी शक्यता आहे की हा चित्रपट केल्यानंतर मला वाटेल की आता माझ्याकडे करण्यासाठी असं काही राहिलं नाही. ही गोष्ट इतकी खोलवरची आणि मोठी आहे की यानंतर मी काही करू शकणार नाही." त्यानं सांगितलं की त्याची इच्छा आहे की त्यानं शेवटच्या क्षणापर्यंत काम करावं. पण जर कोणत्या एका चित्रपटाला अखेरचं म्हणायचं असेल तर तो 'महाभारत' असेल. आमिरनं सांगितलं की 'महाभारत' चित्रपटाची स्क्रिप्ट बनवण्यासाठी वर्ष जाऊ शकतं.
हेही वाचा : 'हेरा फेरी 3' साठी सापडला नवा बाबुराव? परेश रावल यांची रिप्लेसमेंट पाहून चाहते थक्क; म्हणाले, 'नको ना प्लीज!'
या आधी देखील The Hollywood Reporter ला दिलेल्या मुलाखतीत आमिरनं सांगितलं की 'हे त्याचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि त्यासाठी खूप तयारी करण्याची गरज आहे.' आमिरनं हे मान्य केलं की इतका मोठा प्रोजेक्ट आहे की त्याची स्क्रिप्ट बनवण्यासाठीच वर्षे लागतील. त्यांचं म्हणणं आहे की हा चित्रपट बनवण्यासाठी खूप विचार करावा लागेल. त्यानं हे देखील म्हटलं की अजून हे ठरलेलं नाही. आमिर खाननं सांगितलं की 'जी भूमिका ज्या कलाकाराला सूट करते, त्यालाच घेण्यात येईल.' इतकंच नाही तर अशी शक्यता त्यानं व्यक्त केली आहे की तो स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नाही, कारण इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याला एकट्यानं साकारणं सोपं नसेल. आमिरनं सांगितलं की 'महाभारत' ला एक चित्रपटात दाखवणं शक्य नाही. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवण्यात येईल.