Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्फी जावेद मुलीसोबत...? अर्रsss पुन्हा नवा कहर, फोटो पाहून डोक्याला माराल हात!

Urfi Javed Relationship with Girl?: उर्फी जावेद आणि तिच्या मैत्रीणीचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. यावेळी त्या दोघी फारच कॉझी दिसत आहेत त्यामुळे त्या दोघी रिलेशनशिपमध्ये आहेत की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. फोटो पाहून आता तुम्हीच ठरवा! 

उर्फी जावेद मुलीसोबत...? अर्रsss पुन्हा नवा कहर, फोटो पाहून डोक्याला माराल हात!

उर्फी जावेद अनेकदा आपल्या वादग्रस्त आऊटफिट्ससाठी ओळखली जाते. त्यानंतर आपल्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठीही तिची चर्चा होते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या या विक्षिप्त फॅशनविरोधात आक्षेप घेतला होता. त्यावरून चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले होते. दोघीही एकमेकींनी सुनावत होत्या. त्यामुळे माध्यमांमध्ये या दोघींच्या कॅट फाईटची चर्चा होती. उर्फी जावेदवर अनेकदा टीका केली जाते. तिच्या विक्षिप्त फॅशनमुळे ती भारतीय संस्कृतीचे उल्लंघन करते आहे अशी सतत तिच्यावर टिका होताना दिसते. त्यामुळे उर्फी जावेद म्हणजे एक सोशल मीडिया सेन्सेशन बनले होते. लॉकडाऊननंतर ही परी सोशल मीडियावर आली आणि इथेच स्थिरावली. आता मोठेमोठे ब्रॅण्ड्सही तिच्यामागे लागताना दिसत आहेत. मध्यंतरी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या ब्रॅण्डनं तिला मॉडेल म्हणून घेतले होते. त्यांच्या सुंदर आणि महागड्या अशा आऊटफिटमध्ये पाहून हेटर्सच्या भुवया उंचावल्या होत्या. इतक्या सगळ्या वादांनंतर आता उर्फीनं पुन्हा एकदा कहर केला आहे. 

सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्या ती एका मुलीला कीस करताना दिसते आहे. यावेळी तिनं चक्क तिला लिपलॉक किस केले आहे. तिनं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'लव्ह या!' 17 ऑगस्ट रोजी तिनं हे ट्विट केले होते. यावेळी त्या दोघी एकदम कॉझी होताना दिसत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी यावर लगेचच कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. उर्फी लेस्बियन आहे का? ती मुलीला डेट करते आहे का? अशा नानाविध चर्चा रंगताना दिसत आहेत. सोशल मीडियावर म्हणून उर्फी जावेदच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : गायक Mika Singh ने मित्राला गिफ्टमध्ये दिला चक्क 4 कोटींचा फ्लॅट... सोशल मीडियावर होतोय ट्रोल, कारण

समोर आलेल्या माहितीनुसार, या मुलीचे नावं काजोल असे आहे. उर्फीनं त्या दोघींच्या जो फोटो शेअर केला आहे त्यानुसार सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. त्यातून यावेळी त्या दोघींनी किंवा उर्फीनं याबाबत कसलेच ऑफिशियल स्टेटमेंट दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या फोटोची चांगलीच चर्चा आहे. त्यातून त्या दोघी या अनेकदा डिनरला आणि पार्टीला एकत्र जाताना दिसतात. अशावेळी त्यांच्या या फोटोनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच #Trending असते त्यामुळे तिची चर्चा पिकायला फार वेळही लागत नाही. तिच्या आजही टीका होताना दिसते. परंतु ती आपला चरिष्मा कॅरी करते. 

Read More