Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिनाची बहिण इसाबेल या अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण...

कतरीना कैफची बहिण इसाबेल कैफ या अभिनेत्यासोबत करणार डेब्यू.

कतरिनाची बहिण इसाबेल या अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण...

मुंबई : हिरो या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारा अभिनेता सुरज पंचोलीने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर एक नवे पोस्टर शेअर करुन आपल्या नव्या सिनेमाची माहिती दिली. या सिनेमात तो प्रमुख भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत कतरीना कैफची बहिण इसाबेल कैफ झळकणार आहे.

टाईम टू डान्स

सलमान खानच्या हिरो सिनेमातून सूरजने डेब्यू केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचे नाव टाईम टू डान्स असे आहे. डान्स या विषयावर हे कथानक फिरत आहे. रिपोर्ट्सनुसार, सूरज आणि इसाबेल यात लेटिनो अमेरिकन, सालसा, झुंबा करताना दिसणार आहेत. या सिनेमाची कथा रेमो डिसूजाने लिहिली आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा 

रेमो डिसुजा स्वतः एक उत्तम डान्सर आहे. रेमोचा हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात मोठा डान्सवरील सिनेमा असेल. या सिनेमाचे शूटिंग एप्रिलच्या शेवटापर्यंत सुरू होईल.

 

Read More