Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मला नागार्जुनने 14 कानाखाली मारल्या होत्या,' बॉलिवूड अभिनेत्रीने केला खुलासा, 'माझ्या गालावर...'

बॉलिवूड अभिनेत्री इशा कोपीकर 2024 मध्ये आलेल्या सायन्स फिक्शन चित्रपट अयलानमध्ये अखेरची दिसली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने काही किस्से सांगितले आहेत.  

'मला नागार्जुनने 14 कानाखाली मारल्या होत्या,' बॉलिवूड अभिनेत्रीने केला खुलासा, 'माझ्या गालावर...'

बॉलिवूड अभिनेत्री इशा कोपीकरने आपल्या करिअरमधील सर्वात कठीण सीनबद्दल सांगितलं आहे, ज्यामध्ये तिला एक, दोन नव्हे तर 14 कानाखाली खाव्या लागल्या होत्या. हो तुम्ही अगदी योग्य वाचलं आहे. आता या कानाखाली कोणी मारल्या असतील असा प्रश्न साहजिकपणे तुमच्या मनात आला असेल. या कानाखाली इतर कोणी नाही तर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने मारल्या होत्या. चंद्रलेखा चित्रपटाच्या सेटवर हा किस्सा घडला होता. इशा कोपीकरचा हा दुसराच चित्रपट होता. कृष्णा वामनसीने दिग्दर्शित केलेला हा इशा कोपीकरचा तेलुगु चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून पहिलाच चित्रपट होता.  

इशा कोपीकर त्यावेळी नवखी असल्याने प्रत्येक सीनसाठी आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होती. हिंदी रशशी संवाद साधताना इशाने सांगितलं की, "मला नागार्जुन यांनी कानाखाली लगावली. मी त्या भूमिकेसाठी इतकी कटिबद्ध होते की, मला अगदी खरा अभिनय करायचा होता".

अभिनेत्रीने सांगितलं की, तिला एका सीनमध्ये रागाच्या भावना दाखवायच्या होत्या मात्र ती भावना योग्यरित्या व्यक्त होत नव्हती. यानंतर तिने एक असामान्य विनंती केली. “म्हणून जेव्हा तो (नागार्जुन) मला कानाखाली मारत होता, तेव्हा मला ते जाणवत नव्हतं. हा माझा दुसरा चित्रपट होता, म्हणून मी त्याला म्हणाले, ‘नागा, तू खरोखर मला कानाखाली मार.’ तो म्हणाला, ‘तुला खात्री आहे का? नाही, मी हे करू शकत नाही.’ मी म्हणाले, ‘मला ती भावना हवी आहे. मला आता ती जाणवत नाहीये.’ म्हणून त्याने मला कानाखाली मारली, पण तीदेखील हळूवारपणे,” अशी आठवण तिने सांगितली. 

पण यानंतरही दिग्दर्शकाला चेहऱ्यावर हवे ते हावभाव मिळत नव्हते. यामुळे हा सीन वारंवार शूट करावा लागत होता. "चेहऱ्यावर राग दिसण्याच्या नादात, मला 14 कानाखाली खाव्या लागल्या. शेवटी माझ्या चेहऱ्यावर कानाखालीचे निशाण दिसत होते," असं इशा कोपीकरने सांगितलं. यानंतर नागार्जुनला फार वाईट वाटत होतं. बिचारा माझ्याजवळ बसला होता. मला सॉरी म्हणाला. मी म्हटलं, मीच सांगितलं होतं, तू सॉरी का म्हणत आहेस?," अशी आठवण तिने सांगितली. 

चंद्रलेखा हा त्याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता, जो मूळतः प्रियदर्शनने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात रम्या कृष्णन, मुरली मोहन, चंद्र मोहन, गिरी बाबू आणि तनिकेला भरणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

इशा कोपीकरने डॉन, एलओसी कारगिल आणि सलाम-ए-इश्क यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवकार्तिकेयन आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 2024 च्या सायन्स फिक्शन चित्रपटा आयलानमध्ये शेवटची दिसली होती. शरद केळकर, योगी बाबू, करुणाकरन, भानुप्रिया आणि डेव्हिड ब्रॉटन-डेव्हिस हे देखील या चित्रपटाचा भाग होते.

Read More