Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO TRAILER : 'स्त्री'नंतर आता येतोय 'लुप्त'

कॉमेडियन आणि अभिनेता विजय राज सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय

VIDEO TRAILER : 'स्त्री'नंतर आता येतोय 'लुप्त'

मुंबई : बॉलिवूडची हॉरर आणि कॉमेडी सिनेमा 'स्त्री' बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून द्यायला सुपरनॅच्युरल थ्रिलर 'लुप्त' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 'लुप्त' हा एक भयानक आणि अंगावर शहारे उभे करायला लावणारा सिनेमा असल्याचं सांगण्यात येतंय. अभिनेता जावेद जाफरी आणि विजय राज स्टारर 'लुप्त' सिनेमा 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

'लुप्त'च्या ट्रेलरमध्ये जावेद जाफरी एका व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो क्रॉनिक इनसोमनियानं (झोपेचा आजार) पीडित आहे. जावेदला आपल्या आजुबाजुला काही सावल्या, अदृश्यं लोक दिसायला सुरूवात होते... यामुळे तोच नाही तर त्याचं कुटुंबही हैराण होतं. 

जावेद एका काऊन्सलर - सायकियाट्रिस्टची (विजय राज) मदत घेतो. कॉमेडियन आणि अभिनेता विजय राज सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय. 

जावेद आणि विजय शिवाय करन आनंद, मीनाक्षी दीक्षित, निकी वालिया आणि ऋषभ चड्ढा यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

Read More