Marathi News> मनोरंजन
Advertisement

जॅकलिन फर्नांडिस बनली सोशल मीडियाची क्वीन

ठरली बॉलिवूडची पहिली अभिनेत्री...

जॅकलिन फर्नांडिस बनली सोशल मीडियाची क्वीन

मुंबई : बॉलिवूडची ग्लॅम डॉल जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियाची क्वीन बनली आहे. नुकताच जॅकलिननं इन्स्टाग्रामवर २० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे सगळ्यात कमी वेळात हा आकडा जॅकलिननं गाठला आहे. एवढ्या कमी वेळात कुठल्याच बॉलिवूड स्टारने हा आकडा गाठलेला नाही.

जॅकलिन नेहमी तिच्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत असते. त्यामुळेच तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोपडा यांचे देखील इन्स्टाग्रामवर जवळपास 25 लाखापर्यंत फॉलोअर्स आहेत. जॅकलिन या गोष्टीने खूप खूश आहे. तिने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांचे आभार मानत आहे.

जॅकलिन लवकरच सुशांत सिंह राजपूत सोबत 'ड्राइव्ह' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय जॅकलिन साजिदच्या 'किक 2'मध्ये देखील झळकणार आहे. 'किक'मध्ये देखील सलमान आणि जॅकलिन यांची जोडी दिसली होती. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे.

Read More