Marathi News> मनोरंजन
Advertisement

OMG! प्लॅस्टिक सर्जरीच्या आधी कपूर सिस्टर्स पाहा कशा दिसायच्या

Kapoor Sisters Plastic Surgery : आपण अनेकदा पाहिलं आहे की बड्या बॉलिवूडच्या अभिनेत्री या महागड्या प्लॅस्टिक सर्जरी करताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली दिसते. सध्या कपूर स्टिस्टर्स म्हणजे शनाया कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचा प्लॅस्टिक सर्जरी पुर्वीचा लुक व्हायरल झाला आहे हे पाहून तर तुम्हाला धक्काच बसेल. 

OMG! प्लॅस्टिक सर्जरीच्या आधी कपूर सिस्टर्स पाहा कशा दिसायच्या

Kapoor Sisters Plastic Surgery : बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या प्लॅस्टिक सर्जरीची. त्यामुळे त्यांना ट्रोलही केलं जाते. महागडी सर्जरी करून अभिनेत्री सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्या चांगल्याच ट्रोल होतात. सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्री वाट्टेल त्या थराला जातात. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. अनेकदा अशाही बातम्या समोर आल्या आहेत की सर्जरी करताना काहीतरी मोठी चूक होते आणि अनेकदा या प्लॅस्टिक सर्जरीची वेगळीच रिएक्शनही होते आणि मृत्यूही ओढवतो. यावेळी तुम्हाला याची खबरदारी घेणंही फार महत्त्वाचे असते. बॉलिवूडमधील अनेक बड्या आणि टॉपच्या अभिनेत्रींंनी प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आहे. यात शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा, जान्हवी कपूर, श्रीदेवी, शनाया कपूर, खुशी कपूर यांचा समावेश आहे. ज्यांनी फारच महागड्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत आणि आपलं रूपच बदलून टाकलं आहे. 

सध्या यातील कपूर सिस्टर्सचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात तुम्हाला कळून येईल की चक्क या तिघी प्लॅस्टिक सर्जरी करण्यापुर्वी कशा दिसत होत्या. त्याचे पुर्वीचे रूप पाहून तर तुम्हाला धक्काच बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही नाना तऱ्हेच्या कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. आता शनाया कपूर, खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांचे रूप तर पुर्णत: बदलले आहे. परंतु या इंडस्ट्रीत येण्यापुर्वी त्या पुर्णत: वेगळ्या दिसत होत्या. अगदी तुमच्या आमच्यासारख्याच. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी सौंदर्य विकतच घेतले आहे. 

हेही वाचा : भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल

यावेळी या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले आहे. तर काहींनी त्यांची बाजूही घेतली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी असं म्हटलंय की, तुमच्याकडे फक्त पैसा असायला हवा म्हणजे तुम्ही हे सगळं करू शकता. तर अशाच एका ट्रोलरनं लिहिलंय की, मला पैसे द्या, मीही असं करतो. तर काहींनी म्हटलंय की, काही नाही त्या फक्त मोठ्या झाल्या आहेत. तर काहींनी म्हटलंय, इंडियन व्हर्जन ऑफ कार्डिशियन्स. काहींनी असंही म्हटलंय की, त्यांना ट्रोल करून नका. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कपूर ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे. खुशी कपूर त्यांनी धाकटी मुलगी आहे. तर शनाया कपूर ही संजय कपूर आणि महीप कपूर यांची लेक आहे. तिघींनीही बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. तर लवकरच खुशी कपूर ही डेब्यू करणार आहे. 

Read More