मुंबई : सिनेमा जगत गेल्या काही महिन्यांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवतेय असं म्हणायला हरकत नाही. एकाहून एक दमदार कथानकं आणि तितक्याच पट्टीच्या कलाकारांच्या अभिनयानं नटलेले बरेच चित्रपट गेल्या काही काळात प्रदर्शित झाले.
अभिनेता Suriya याची मध्यवर्ती भूमिका असणारा Jai Bhim हासुद्धा त्यातलाच एक चित्रपट.
चाहते आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटानं वास्तवदर्शी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
आता म्हणजे सध्या चर्चेत असणाऱ्या 'पुष्पा' या चित्रपटालाही सुर्याच्या या कलाकृतीनं मागे टाकलं आहे.
कारण, चित्रपटाला थेट ऑस्करमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.
Academy Awards च्या अधिकृत YouTube चॅनलवर चित्रपटातील एक दृश्य दाखवण्यात आलं आहे.
एखाद्या तामिळ चित्रपटाला हा बहुमान मिळण्याची पहिलीच वेळ. ज्यामुळं सोशल मीडियावर सध्या या चित्रपटावर आणि त्यातील कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात आहे.
एका युजरने चित्रपटाचं यश पाहता भारतीय सिने जगताचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. तर, एकानं सुर्याचं तेज असंच राहो अशी सदिच्छाही व्यक्त केली.
अतिशय गाजलेला असा हा चित्रपट Best Non-English Language Film विभागातून Golden Globes 2022 मध्येसुद्धा नामांकन मिळवणारा चित्रपट ठरला होता.
A scene of #JaiBhim has been uploaded on #Oscars YouTube channel. #Suriya made us and #Indian cinema proud.
— Harpreet Kaur (@Harpree14659300) January 18, 2022
Really a awesome movie must watch!pic.twitter.com/ATxcXjYKSS
#JaiBhim - Wow.. #Oscars YouTube channel uploaded the summary of the film with Director TJ.Gnanavel explanation about the story & execution.
— V-KAS (@VIKASHVIKEE) January 18, 2022
A gem from Kollywood..#Suriya - Vera level.. proud moment for Anbaana fans..Lot more to come..@Suriya_offl #Oscars pic.twitter.com/sVckR6du4g
Proud to know that #JaiBhim is the first Tamil film to be posted on the #Oscars youtube channel! I'm extremely overjoyed and being a Suriya fan, I'm even more thrilled. It's not easy to produce a film like Jai Bhim and the man has done it! Love you @Suriya_offl anna!
— (@eva_puxple) January 18, 2022
#jaibhim become the first Indian movie to be featured in #Oscars YouTube channel@Suriya_offl na making us a indian cinema proud
— anjaan_safi (@ar84777001) January 18, 2022
Proud to be Suriya anna veriyan.. pic.twitter.com/6IsKbvQRzE
विविध विक्रम रचणाऱ्या या चित्रपटाला IMDb नंही 9.6 इतकं रेटिंग दिलं होतं.
चित्रपटाला मिळालेलं हे यश पाहता, खरंच सर्व कलाकारांना ही बाब सुखावणारी ठरली असेल यात शंका नाही.