Marathi News> मनोरंजन
Advertisement

Confirm : इशा केसकर करतेय 'या' अभिनेत्याला डेट

आज सगळेचजण आपल्या प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत असताना. 

Confirm : इशा केसकर करतेय 'या' अभिनेत्याला डेट

मुंबई : आज सगळेचजण आपल्या प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत असताना. 

 झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेतील बानू म्हणजे इशा केसकर हिने एक खास फोटो व्हॅलेंटाईन डे निमित्त शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगतेय. कारण या फोटोतील व्यक्ती प्रत्येकाच्याच ओळखीची आहे. 

इशा करतेय या अभिनेत्याला डेट 

या फोटोमध्ये तिच्यासोबत आपल्याला काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला पाहायला मिळत आहे. या फोटोत त्या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे. इशाने एका खास अंदाजात ऋषीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी" असे तिने लिहिले आहे. हा फोटो शेअर केल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून जी चर्चा रंगली होती त्याला Confirmation मिळालं आहे. 

 

Yes, it has! PC: @jeenomora

A post shared by Isha 'kamikes'kar (@isha_ck) on

काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आज ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी ऋषीने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे. शिवला त्याचे फॅन्स सध्या चांगलेच मिस करत आहेत. 

Read More