Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्जुन कपूरला बर्थ डे विश करताना जान्हवी म्हणाली ...

एक वेळ अशी होती जेव्हा बोनी कपूरच्या पहिल्या आणि दुसर्‍या पत्नीसोबतच त्यांच्या मुलांमध्येही एक भिंत होती.

अर्जुन कपूरला बर्थ डे विश करताना जान्हवी म्हणाली ...

मुंबई : एक वेळ अशी होती जेव्हा बोनी कपूरच्या पहिल्या आणि दुसर्‍या पत्नीसोबतच त्यांच्या मुलांमध्येही एक भिंत होती. त्यांच्यामध्ये अबोला होता. श्रीदेवीसह त्याच्या दोन्ही मुलींचा अर्जुन आणि अंशुलासोबत फारसा संवाद होत नसे. मात्र श्रीदेवींच्या निधनानंतर हे रूप बदललं आहे. काही दिवसांपूर्वी सोनम कपूरच्या लग्नात एकत्र आलेली ही भावंड आता इमोशनीही एकमेकांच्या जवळ आली आहेत. 

आज अर्जुन कपूरचा वाढदिवस 

आज अर्जुनचा वाढदिवस आहे. अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी जान्हवी कपूरने खास संदेश आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आज अर्जुन कपूरचा 33 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये  अर्जुन आमची स्ट्रेन्थ आहे असे म्हणताना त्याचा उल्लेख 'अर्जुन भय्या' असा केला आहे. 

 

 

You are the reason for our strength. Love you, happy birthday Arjun bhaiya 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

'धडक' साठी अर्जुनने दिल्या शुभेच्छा 

'धडक' या चित्रपटातून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेलर लॉन्च वेळेस कपूर कुटुंबीयांनी त्या सोहळ्याला हजेरी लावत जान्हवी आणि 'धडक' सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळेस गैरहजर असलेल्या अर्जुन कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून जान्हवीला शुभेच्छा आणि कानमंत्र दिला.  
सध्या अर्जुन कपूर 'नमस्‍ते इंग्लंड' आणि 'संदीप और पिंकी फरार' या सिनेमामध्ये व्यस्त आहे. या दोन्ही सिनेमात अर्जुनसोबत परिणिती चोप्रा झळकणार आहे.  

Read More