Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्रीदेवींसाठी जान्हवीची भवनिक पोस्ट

बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी काळाच्या पडद्या आड गेली. त्यांना देवयाज्ञा प्राप्त होवून एक वर्ष पूर्ण झाले. 

श्रीदेवींसाठी जान्हवीची भवनिक पोस्ट

मुंबई : बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी काळाच्या पडद्या आड गेली. त्यांना देवयाज्ञा प्राप्त होवून एक वर्ष पूर्ण झाले. बॉलिवूडमध्ये श्रीदेवींनी एक काळ गाजवला होता. आपल्या अभिनयाच्या बळावर या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात छाप पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात मोठे संकट ओढावले होते. अभिनेत्री जान्हवी कपूरने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. अत्यंत भावूक असा हा फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने, 'माझे अंत:करण अत्यंत जड झले आहे. पण मी नेहमी आनंदी राहिल कारण माझ्या मनात तू आहेस' असे लिहले आहे.

fallbacks

मागील वर्षी २४ फेब्रुवारी रोजी दुबईतील एका आलीशान हॉटेलमध्ये श्रादेवी मृत अवस्थेत अढळल्या होत्या.  आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी त्या दुबईत गेल्या होत्या.  श्रीदेवींनी पती बोनी कपूर यांना काही काळ दुबईत थांबण्यासाठी आग्रह केला होता पण बोनी कपूर कामा निमीत्त मुंबईत आले. त्यानंतर हॉटेलच्या बाथटबमध्ये श्रीदेवींचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड त्याचप्रमाणे देशभरात एकच खळबळ माजली. श्रीदेवींची शेवटची झलक शाहरुख खानच्या झिरो सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून अनुभवास मिळाली. 

Read More