Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जान्हवीच्या दारी कोट्यवधींच्या Car; इतक्या किंमतीत पाच घरं येतील

अभिनेत्री जान्हवी कपूरकडे अनेक आलिशान कार असून त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. पाहुयात जान्हवीचं कार कलेक्शन

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जान्हवीच्या दारी कोट्यवधींच्या Car; इतक्या किंमतीत पाच घरं येतील

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लेक अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवीने 2018मध्ये आलेल्या 'धडक' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

fallbacks
नुकताच तिचा 'रुही' हा सिनेमा रिलीज झाला मात्र या सिनेमाला म्हणावं तितकं यश मिळालं नाही.  सिनेमात फार चमकदार कामगिरी केली नसली तरी जान्हवी कोट्यवधींच्या कारची मालकीण आहे. आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जान्हवी कपूरच्या गाड्यांचं कलेक्शन. 

fallbacks
यात पहिला नंबर येतो  Mercedes GLE 250d.या कारची किंमत आहे जवळपास 67 लाख रुपये.  ही कार 8 सेकंदात 0 ते 100 चा वेग गाठू शकते.

fallbacks
जान्हवीची दुसरी कार आहे BMW X5. या कारची किंमत आहे 96 लाख रुपये. ही कार 6 सेकंदात 0 ते 100 चा वेग गाठू शकते.

fallbacks

जान्हवीकडे या व्यतिरिक्त अनेक कार आहेत ज्यात Mercedes Benz S-Classचा सुद्धा समावेश आहे. या कारची किंमत आहे 1.62 कोटी रुपये.

fallbacks
जान्हवीकडे सर्वात महागडी कार आहे Mercedes Maybach S560 या कारची किंमत आहे 1.94 कोटी रुपये.

fallbacks

जान्हवी कपूर लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात राजकुमार रावसोबत जान्हवी स्क्रीनवर झळकणार आहे.

Read More