Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction

Janhvi Kapoor Speakes In Tamil : जान्हवी कपूरच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction

Janhvi Kapoor Speakes In Tamil : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या तिच्या देवरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. ज्युनियर एनटीआर स्टारर देवरा पार्ट 1 च्या प्रमोशन दरम्यान, जान्हवीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे जान्हवीनं या वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी तमिळमध्ये संवाद केला आहे. 

जान्हवीनं तमिळमध्ये स्पीच दिलं आहे. या व्हिडीओला पाहून तिच्या चाहत्यांना विश्वास होत नाही आहे. इतकंच नाही तर त्यांना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण झाली. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी चैन्नईला गेली होती. त्यावेळी जान्हवीनं सांगितलं की तिची आई अर्थात श्रीदेवी आणि चैन्नईच्या खास आठवणी आहेत. त्यावेळी जान्हवी म्हणाली, 'चैन्नई माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या आईसोबतच्या सगळ्यात चांगल्या आठवणी या चैन्नईतील आहेत. मी आणि माझं कुटुंब इथे असण्याचं कारण तुम्ही माझ्या आईला जे प्रेम दिलं ते आहे. मी कायम यासाठी तुमची आभारी राहिन. आईला तुम्ही जे प्रेम दिलं तेच मला द्याल याचा आशा आहे.' जान्हवीनं तमिळमध्ये केलेल्या हा संवाद ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना आश्चर्य झाले आणि त्यांना याचे कौतुक देखील वाटले. 

पुढे जान्हवी म्हणाली, 'मी खूप मेहनत करेन याचं मी वचन देते. देवारा माझ्यासाठी खूप खास आहे. मनापासून मला आशा आहे की आम्ही जे काही बनवलं ते तुम्हाला आवडेल.' त्यानंतर या कार्यक्रमाची सुत्रसंचालक स्टेजवर येऊन म्हणते की तिला आशा आहे की 'जान्हवी लवकरच एका तमिळ चित्रपटाची घोषणा करेल', त्यावर उत्तर देत जान्हवी म्हणाली, 'मला पण आशा आहे.'

दरम्यान, जान्हवीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'खूप सुंदर, तिनं तिच्या आईच्या गावातील लोकांना खूप सुंदर अशी भेट दिली आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिला एक तमिळ चित्रपट द्यायलाच हवा, कारण ती खूप सुंदर आणि स्पष्ट तमिळ बोलते.'

हेही वाचा : करीना कपूरची लॉटरी लागली, मिळाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट!

जान्हवी आणि ज्युनियर एनटीआरचा 'देवरा: पार्ट 1' हा चित्रपट 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय जान्हवी ही वरुण धवनसोबत 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटात दिसणार आहे. 

Read More