Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनूप जलोटांच्याआधी जसलीन या सिंगरला करायची डेट

 जसलीन आणि सुखविंदर यांच्या नात्याविषयी अनुप यांना काहीच माहीत नव्हतं. 

अनूप जलोटांच्याआधी जसलीन या सिंगरला करायची डेट

मुंबई : सलमान खानचा पॉप्यूलर टीव्ही शो 'बिग बॉस सीझन 12' धक्कादायक खुलासा झालायं. जसलीन मथारू आणि अनूप जलोटा यांच्या नातेसंबधाबद्दल ऐकून अनेकजणांना धक्का बसला होता. जसलीन ही अनूपच्याआधी सिंगर सुखविंदरला डेट करत होती. जसलीन ही सुखविंदरपेक्षा 19 वर्षांनी लहान आहे. अनूप जलोटांसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली. यातली धक्कादायक बाब म्हणजे जसलीन आणि सुखविंदर यांच्या नात्याविषयी अनुप यांना काहीच माहीत नव्हतं.

कॅप्टन्सी टास्कमध्ये खुलासा 

शो दरम्यान कॅप्टन्सी टास्कमध्ये हा खुलासा झालायं.

जसलीनचे हे सिक्रेट अनूप जलोटा यांना समजले. पण आपल्याला काही माहीतच नव्हते असे त्यांनी आपल्या चेहऱ्यावरून दाखवून दिले नाही.

मला या नात्याबद्दल आधीपासूनच माहीत होत असं अनूप यांनी यावेळी सांगितले.

जसलीन आणि सुखविंदर यांच्या नात्याविषयी मला एका फ्रेंडने आधीच सांगितलं असे ते म्हणाले.

सुखविंदरसोबत आपलं नातं तुटल्यानंतर जसलीनंने भजन गायक अनूप जलोटाला डेट केलं.

एकीकडे जसलीन-अनूप यांच्या नात्याविषयी चर्चा असताना सुखविंदर आजही विना लग्नाचाच आहे. 

Read More