Marathi News> मनोरंजन
Advertisement

धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकरचा वापर नको-जावेद अख्तर

 वर्षभरापूर्वी गायक सोनू निगमने मशिदीत होणाऱ्या अजानविषयी एक ट्विट केलं होतं.

धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकरचा वापर नको-जावेद अख्तर

मुंबई :  ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गायक सोनू निगमच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. वर्षभरापूर्वी गायक सोनू निगमने मशिदीत होणाऱ्या अजानविषयी एक ट्विट केलं होतं. त्यानंतर सोनूवर अनेकांचाच रोष ओढवला होता. त्यानंतर कुठेतरी हा वाद शमला. 

या विषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात

मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा धार्मिक स्थळांवर होणारा लाऊड स्पीकरचा वापर याविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

सोनू निगमचंही समर्थन

यात आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एक ट्विट केलंय. ज्याच्या माध्यमातून त्यांनी सोनू निगमचंही समर्थन केलं आहे. फक्त मशिदीवरच नव्हे, तर निवासी क्षेत्र असणाऱ्या कोणत्याही धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकरचा वापर केला जाऊ नये असं मत जावेद अख्तर यांनी या ट्विटच्या माध्यमातून मांडलं आहे.

Read More