Marathi News> मनोरंजन
Advertisement

'नरक किंवा पाकिस्तान दोघांपैकी एक निवडायचं असेल, तर मी...,' जावेद अख्तर असं का म्हणाले?

Javed Akhtar Over Pakistan and Hell :  जावेद अख्तर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'नरक किंवा पाकिस्तान दोघांपैकी एक निवडायचं असेल, तर मी...,' जावेद अख्तर असं का म्हणाले?

Javed Akhtar Over Pakistan and Hell : बॉलिवूडचे दिग्गज लिरिक्स आणि स्क्रिप्ट राइटक जावेद अख्तर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते सामाजिक मुद्यांवर मोकळेपणानं बोलताना दिसतात आणि सोशल मीडियावर देखील ते सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तनावपूर्ण वातावरणावर त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की नरक आणि पाकिस्तानमध्ये जर चॉईस मिळाली तर ते काय निवडतील. त्यासोबत त्यांनी हे देखील सांगितलं की भारतातून जायला सांगितलं आणि पाकिस्तानमध्ये काफिर म्हणतात. 

जावेद अख्तर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या एका बूक लॉन्चिंग कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानला घेऊन वक्तव्य केलं आहे आणि म्हटलं की इथले लोकं जायला सांगतात आणि तिथले (पाकिस्तानचे) लोकं काफिर म्हणतात. कार्यक्रमात जावेद यांनी सांगितलं की कोणी एका बाजूनं वक्तव्य केलं तर काही लोकं नाराज होतात. जर सगळ्यांकडून बोलायचं झालं तर मोठ्या संख्येनं लोकं नाराज होतात. त्यांनी ट्विटर, व्हॉट्सअप दाखवण्याविषयी देखील सांगितलं. ते म्हणाले दोन्ही कडून त्यांना फक्त शिव्या मिळत आहेत. 

जावेद अख्तर पुढे म्हणाले की असं नाही की ते थॅंकलेस आहेत. खूप लोकं त्यांची स्तुती देखील करता आणि त्यांना हिम्मत देतात. जावेदनं पुढे म्हटलं की इथे आणि तिथे (भारत-पाकिस्तान) दोन्ही बाजून त्यांना शिव्या पडतात. हे योग्य आहे असं म्हणत ते म्हणाले की जर शिवीगाळ एकीकडून बंद झाला तर त्यांना चुकल्यासारखं वाटेल. पाकिस्तानचे लोक त्यांना काफिर म्हणतात आणि जहन्नुममध्ये जा असं म्हणतात. तर (भारत) जिहादी म्हणून पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगतात. 

नरक किंवा पाकिस्तान यात कसली निवड करणार?

त्यासोबत जावेद अख्तर यांनी नरक आणि पाकिस्तानमध्ये काही निवडण्यावर वक्तव्य केलं आणि म्हटलं की जर त्यांच्याकडे पाकिस्तान आणि नरक दोघांमध्ये काही निवडायला सांगितलं तर ते नरकात जाणं पसंत करतील असं म्हणाले. त्यासोबत त्यांनी म्हटलं की जेव्हा ते मुंबई आले होते तेव्हा ते फक्त 19 वर्षांचे होते. ते महाराष्ट्राला त्यांची कर्मभूमी म्हणतात आणि त्यासोबत ते आज जिथे कुठे पोहोचले आहेत, त्यांना जे काही मिळालं आहे आणि सगळं काही मुंबईनं दिल्याचं सांगितलं.  

हेही वाचा : 'गार्गी' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; व्हॉट्सअप नोट अन् नागपुरातील 'तो' मठ...

लक्षवेधी गोष्ट ही आहे की जावेद अख्तर भारत-पाकिस्तानमध्ये असलेले तनावपूर्ण नात्यावर त्यांची प्रतिक्रिया देताना दिसतात. ते पहलगामपासून ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पाकच्या हल्ल्यावर त्यांचं काय मत आहे हे त्यांनी मांडलं. 

Read More