Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्यन खान प्रकरणी जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य; ....म्हणून मिळतेय शिक्षा

आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाची आज सुनावणी 

आर्यन खान प्रकरणी जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य; ....म्हणून मिळतेय शिक्षा

मुंबई : ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान खूप दिवसांपासून अडकला आहे. आज आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आर्यनकडे या प्रकरणाशी संबंधीत काहीच पुरावे सापडलेले नाही. मात्र त्याच्या मित्रांकडे ड्रग्स सापडलं आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिलेत की, आर्यन खानला का सोडलं जात नाही? 

आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरूख खानच्या संकटात वाढ होत आहे. अगदी त्याला आपली शुटिंग देखील सोडावी लागली. सुपरस्टार अनेक संकटांना सामोर जात आहे. आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर शाहरूख खानच्या मुलाच्या बचावाकरता समोर आले आहेत. 

शाहरूखला मिळाली बॉलिवूडची साथ 

एनसीबीने ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. आता तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. यावेळी बॉलिवूडमधून शाहरूख खानला सपोर्ट मिळत आहे. काही कलाकार या प्रकारणावर प्रतिक्रिया दित नाहीत. अशावेळी आर्यन खानच्या पाठिंब्याकरता अनेक कलाकारांनी सपोर्ट केला आहे. आर्यन खानला कारागृहातून सोडण्याची मागणी केली जात आहे. यामध्ये सुनील शेट्टी, रवीना टंडन, हंसल मेहता, फराह खान, पूजा बेदी, सलमान खान, सुचित्रा कृष्णमूर्ती, जॉनी लीवर यांचा समावेश आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जावेद अख्तर यांच आर्यन खानच्या सपोर्टकरता मोठं वक्तव्य या प्रकरणात जावेद अख्तर म्हणाले की,'मी पोर्टवर पकडण्यात आलेल्या 1 बिलियन डॉलर कोकीनबाबत एकही बातमी पाहिली नाही. मात्र 1.30 लाख चरस गांजा पकडल्याची बातमी नॅशनल न्यूज होते. फिल्म इंडस्ट्री हाय प्रोफाईल असल्यामुळे ही शिक्षा भोगत आहे.' जावेद अख्तर कायमच आपल्या स्ष्ट बोलण्यामुळे चर्चेत असतात.

Read More