Javed Akhtar Supports Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याचा आगामी फिल्म 'सरदार जी 3'. दिलजीतच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे लोकांचा संताप वाढलाय. त्यामुळे हानिया आमिर या पाकिस्तानी अभिनेत्रीला चित्रपटात घेतल्यामुळे दिलजीतवर आणि चित्रपटाच्या टीमवर टीका केली जात आहे.
सोशल मीडियावर लोक दिलजीत आणि 'सरदार जी 3'च्या निर्मात्यांना चांगलंच ट्रोल करत आहेत. काही सेलिब्रिटींनीही या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. पण अशात काही लोक आहेत जे दिलजीतचा उघडपणे पाठिंबा देत आहेत. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तरही त्यापैकी एक आहेत.
एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले की, 'बितारा दिलजीत, त्याला काय माहिती होतं असं काही होईल? चित्रपटाची शूटिंग तर या हल्ल्याच्या आधीच झाली होती आणि यात कुठे पाकिस्तानी माणसाचं नुकसान होणार आहे? उलट भारतीय निर्मात्यांचं नुकसान होईल. मग काय उपयोग?'
जावेद अख्तर पुढे म्हणाले, 'जर त्याला आधीच माहिती असतं की असा काही प्रकार होणार आहे, तर त्यानं पाकिस्तानी अभिनेत्रीला घेतलंच नसतं. सरकार आणि सेंसर बोर्डनं या सगळ्यावर थोडी सहानुभूती दाखवायला हवी. त्यांनी म्हणायला हवं की आता हा चित्रपट तयार झाला आहे, पण पुढच्यावेळी असं टाळा.'
हेही वाचा : Good News : इलियाना डिक्रूज दुसऱ्यांदा झाली आई; मुलाची झलक दाखवत सांगितलं नाव
भारतामध्ये जरी या चित्रपटावर वाद सुरू असला, तरी 'सरदार जी 3' परदेशात प्रदर्शित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानातही हा चित्रपट दाखवण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी सेलेब्सचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यात आले होते. त्यामुळे लोकांचा राग अजूनच वाढलाय. अशात आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.