आमिर खानचा 'लगान' हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. जेव्हा ते बनवले जात होते, तेव्हा जावेद अख्तर यांनी हा सिनेमा फ्लॉप होण्याच भाकित केलं होतं. जावेद अख्तर म्हणाले की, तो जो सिनेमा बनवत आहे हा कोणीही पाहणार नाही. एवढंच नाही तर जावेद म्हणाले होते की, थिएटरमध्ये एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकणार नाही. आमिरने आता एका कार्यक्रमात या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट कसा प्रदर्शित केला हे आमिर खानने एका कार्यक्रमात सांगितलं. ज्याने 34 कोटींचा निव्वळ नफा केला आणि 2001 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात आमिर खानने गमतीने म्हटले की, तो 60 वर्षांचा होणार आहे पण त्याला अजूनही 18 वर्षांचा असल्यासारखे वाटते. पण जेव्हा तो स्वतःला आरशात पाहतो तेव्हा त्याचा भ्रम तुटतो. 'लगान'च्या शूटिंगदरम्यान तो घाबरला होता, असे त्याने सांगितले. त्याला भीती वाटत होती. जावेद अख्तर यांनी चित्रपटाच्या संकल्पनेवर अविश्वास व्यक्त केल्याचे अभिनेत्याने सांगितले.
अभिनेता म्हणाला, 'लगान दरम्यान आम्हाला भीती वाटली. जावेद साहेबांनी मला फोन करून त्यांच्या घरी बोलावले. त्यांना कळले की, मी हा चित्रपट बनवत आहे. मी त्यांच्याकडे पोहोचलो तेव्हा ते म्हणाले की, तू काय चूक करत आहेस? तू हा सिनेमा का बनवत आहेस, तो एक दिवसही टिकणार नाही. तुम्ही पहा, खेळ, क्रिकेट यावर बनवलेले चित्रपट कधीच यशस्वी झाले नाहीत. तू या सिनेमात एक वेगळाच कालावधीबद्दल बोलत आहेस, हे कुणाला समजेल?
जावेद अख्तर पुढे आमिर खानला म्हणाले, 'इथे स्वित्झर्लंडमध्ये लोक एक चित्रपट बनवत आहेत आणि तू एका गावाची गोष्ट दाखवणार आहे.' एवढंच नव्हे तर तू अमिताभ बच्चन यांना कथा कथन (नरेशन) करायला सांगतोस. तर मग हा सिनेमा फ्लॉप होणारच ना.
आमिरने पुढे सांगितले की, जावेद साहेबांनी त्याला 'रंग दे बसंती' करू नये असे सांगितले आणि म्हणाले, “'क्लायमॅक्स में हिरो ही नहीं हैं। बिना हिरो के कैसे होगी (क्लायमॅक्समध्ये हिरो नसतो तर तो कसा चालेल)? मुख्य भूमिका काही रँडम भूमिका करत आहे.' पणमी नेहमीच चित्रपटाला प्राधान्य देतो. माझ्यासाठी चित्रपट माझ्यापेक्षा किंवा इतर कलाकारांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून मी चित्रपटासाठी जे काही महत्त्वाचे आहे ते करतो आणि ते जुळवून घेतो.”
रंग दे बसंती हा चित्रपट राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला होता आणि 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात शर्मन जोशी, अतुल कुलकर्णी, कुणाल कपूर, सिद्धार्थ आणि सोहा अली खान यांनीही भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले.