Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाबासाहेबांच्या जयंती निमित्त 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Jay Bhim, Mahaparinirvaan : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व ही या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. 

बाबासाहेबांच्या जयंती निमित्त 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Jay Bhim, Mahaparinirvaan : आपले अवघे आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

त्यावेळी परिस्थिती कशी होती सगळं कसं झालं होतं हे सगळे क्षण टिपणारे नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते असं की नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाधा लवकर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. तर या चित्रपटाचे निर्माते आणि टीमने ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी 'जय भीम' हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित केले आहे. आशिष ढोले यांची संकल्पना आणि अमोल कदम यांनी शब्दबद्ध  केलेल्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे संगीत लाभले आहे. तर या गाण्याला नंदेश उमप यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. उत्साहाने आणि उल्हासाने भरलेल्या या गाण्यात एक अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व या गाण्यातून अधोरेखित होत असून सगळ्यांना अतिशय जोशपूर्ण असू वाटू लागेल असं हे गाणं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे सारे श्रेय अमोल कदम यांना जातेय. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व या गाण्यात मांडले आहे. त्याला रोहन-रोहन आणि नंदेश उमप यांनी उत्तम न्याय दिला आहे. मनाला उभारी देणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.''

हेही वाचा : 'नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान', कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात...

कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स निर्मित 'महापरिनिर्वाण' 'एक कथा दोन इतिहास' हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकार दिसणार आहेत. तर आता हा चित्रपट पाण्यासाठी असलेली चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचत आहे. 

Read More