Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on daughter :  जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये हा मोठा खुलासा केला आहे. 

अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on daughter : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. नव्याच्या या शोचं नाव What The Hell Navya असं आहे. या वॉडकास्टच्या दुसरा सीजन आता सुरु झाला आहे. जया यांच्यासोबत यावेळी श्वेता नंदा देखील होती. जया यांनी फक्त लग्न लग्न आणि रोमान्सवर चर्चा केली नाही तर स्वत: वर बनवण्यात येणाऱ्या मीम्सवर देखील रिअॅक्ट केलं आहे. त्याशिवाय अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद आहे असं सांगितलं. 

नव्या नवेली नंदाच्या या शोचा पहिला एपिसोड नुकताच युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या एपिसोडचं नाव Who Makes The World Go Round असं आहे. या एपिसोडमध्ये नव्यासोबत, आजी जया बच्चन आणि आई श्वेता यांनी हजेरी लावली आहे. एपिसोड जेव्हा संपायला तेव्हा नव्यानं आई श्वेताला विचारलं की आज तिनं कोणत्याही गोष्टीवर जास्त वक्तव्य केलं नाही. तर यावर उत्तर देत श्वेता म्हणाली आज तिनं जास्त प्रश्न हे अशा विषयांवर विचारले ज्याविषयी तिला मुळीच काही माहित नाही. त्याविषयांवर बोलून तिला स्वत:ला मुर्ख दाखवायचं नव्हतं. त्यावर नव्या म्हणाली की आई काय विचार करते हे खूप महत्त्वाचं ठरतं. जया बच्चन यावेळी श्वेता आणि नव्याचं ही चर्चा ऐकत होत्या. तेव्हाच त्या म्हणाल्या, श्वेता माझी ताकद आहे. मुलगा अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद आहे. माहित नाही असं का? याचं हे कारण असू शकतं की ती एक महिला आहे. पण, ती माझी ताकद आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर जया बच्चन, श्वेता आणि नव्या यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यानंतर मीम्सचा मुद्दा आला. तर अनेकदा हे मीम्स जया बच्चन यांच्यावर बनवण्यात येतात. जेव्हा नव्यानं जया यांना यावर प्रश्न विचारला त्यावर त्यांचं काय मत आहे. तेव्हा उत्तर देत जया बच्चन म्हणाल्या, मला फरक पडत नाही. मात्र, जे लोक हे मीम्स बनवतात, ते खूप खराब असतात. त्यांनी हे काम चांगल्या पद्धतीनं करायला हवं. नव्यानं जया यांना सांगितलं की त्यांनी मीम्स कसं बनवायचं हे शिकवलं पाहिजे. तर जया म्हणाल्या मी का शिकवू? जया परत म्हणाल्या की जे लोक त्यांच्यावर मीम्स बनवतात, त्या लोकांच्या पोट भरण्यासाठी त्या न कळत मदत करतात.

हेही वाचा : पैसा कमवायचे म्हणून..., बहिणीला कठीण काळात एकटं सोडून आली होती शमिता शेट्टी

श्वेता ही जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची लेक आहे. जया आणि अमिताभ यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं. श्वेताचं लग्न व्यावसायिक निखिल नंदासोबत झालं. त्यांना दोन मुलं असून नव्या आणि अगस्त्य नंदा आहे. अभिषेक बच्चन विषयी बोलायचे झाले तर त्यानं ऐश्वर्याशी लग्न केलं असून त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. 

Read More