Amitabh Bachchan-Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लव्ह स्टोरी ही 'गुड्डी' (1971) या चित्रपटातून सुरु झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. पण त्यांचं नातं हे 'एक नजर' या चित्रपटा दरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. या चित्रपटातून ते प्रोफेशन्ल आयुष्यातून रोमान्सकडे वळताना दिसले. तर जया बच्चन यांनी जेव्हा सांगितलं की अमिताभ हे सुरुवातीला त्यांच्या नात्यात हे अनरोमॅन्टिक होते.
1998 मध्ये सिमी ग्रेवाल यांच्यासोबत रेन्डेजवसच्या एका एपिसोड दरम्यान, सिमी यांनी जया यांना विचारलं की अमिताभ खऱ्या आयुष्यात रोमॅन्टिक आहेत का? त्या प्रश्नावर उत्तर देण्या आधी अमिताभ म्हणाले नाही. जया न थांबता म्हणाल्या, माझ्यासोबत नाही. या चर्चे दरम्यान, हसत सिमीनं मस्करी करत म्हटलं की त्यानं अडचणी वाढल्या आहेत. जेव्हा अमिताभ यांनी विचारलं की रोमॅन्टिक असण्याचा अर्थ काय आहे. तर जया यांनी सांगितलं की त्यात फूलं आणि वाइन सारखे सरप्राइज देण्यात येतात.
त्यानंतर त्यांनी खुलासा केला की अमिताभ हे खूप लाजाळू आहेत. त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी असं कधीच केलं नाही. जया यांनी मस्करी करत सांगितलं की जर अमिताभ यांची कोणती गर्लफ्रेंड असती तर शक्यता आहे की ते रोमॅन्टिक असते. तर पुढे सिमी यांनी प्रश्न विचारला की जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा कोणता रोमान्स दाखवला तर जया यांनी सांगितलं की नाही, 'त्यांनी कधी कोणत्या विषयावर चर्चा केली नाही.'
अमिताभ त्यांच्या खास अंदाजात मस्करी करत म्हणाले, 'अशा प्रकारे आपण फक्त वेळ वाया घालतो. पुढे जया बच्चन या अमिताभ यांची प्रायॉरिटी विषयी सांगत म्हणाल्या की त्यांचे आई-वडील, मुलं आणि काम सगळ्यात पहिलं येत. त्यांनी मस्करीत सांगितलं की त्यांच्या या लिस्टमध्ये दुसरे लोकं असू शकतात जसं की त्यांचा मेकअप आर्टिस्ट पण या सगळ्यात मी त्यांची सगळ्यात शेवटची प्रायॉरिटी आहे.'
हेही वाचा : आपला कोणता धर्म आहे? सुहानानं प्रश्न विचारताच शाहरुख खाननं दिलं 'हे' उत्तर
हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा समोर आला आहे. नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर एक नेटकरी म्हणाला, ती एक धाडसी महिला आहे आणि तिला असं वाटणं वाीट आहे, पण यातून ती तिची चिकाटी दाखवते.