Marathi News> मनोरंजन
Advertisement

परमाणुनंतर जॉन आता या सिनेमात झळकणार

अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु सिनेमा बॉक्स ऑफिसर चांगलाच गाजला. आता बातमी अशी आहे की, परमाणुनंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. जॉनचा 'रोमियो अकबर वॉल्टर' जो शॉर्टकटमध्ये रॉ म्हटला जातो तो सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

परमाणुनंतर जॉन आता या सिनेमात झळकणार

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु सिनेमा बॉक्स ऑफिसर चांगलाच गाजला. आता बातमी अशी आहे की, परमाणुनंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. जॉनचा 'रोमियो अकबर वॉल्टर' जो शॉर्टकटमध्ये रॉ म्हटला जातो तो सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाच्या शुटींगआधी आज पूजा केली गेली. 17 जून पासून या सिनेमाचं शुटींग सुरु होणार आहे. हा सिनेमा रोबी ग्रेवाल डायरेक्ट करणार आहे. हा सिनेमा आधी सुशांत सिंह राजपूत करणार होता. सिनेमाचा पोस्टर देखील लॉन्च झाला होता पण काही कारणामुळे या सिनेमातून सुशांतने बॅकआऊट केलं. पण आता जॉन अब्राहम हा सिनेमा करणार आहे. जॉन सिनेमात लीड रोलमध्ये असणार आहे.

जॉन हा सिनेमा करणार नाही अशी देखील चर्चा होती. हा सिनेमा राजी सारखा आहे अशी चर्चा होती त्यामुळे जॉनने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता पण सिनेमाची स्क्रिप्ट पाहिल्यानंतर तो हा सिनेमा करण्यासाठी तयार झाला.

Read More