Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनाली बेंद्रेशिवाय 'सरफरोश 2' ची घोषणा

आमीर या सिनेमात असणार? 

सोनाली बेंद्रेशिवाय 'सरफरोश 2' ची घोषणा

मुंबई : सोनाली बेंद्रे आणि आमीर खानचा सुपरहिट सिनेमा 'सरफरोश'चा सिक्वल लवकरच तयार करण्यात येत आहे. अजून या सिनेमातील कलाकारांची नावे नक्की झालेली नाहीत. मात्र असं म्हटलं जातं की, या सिक्वेलमध्ये सोनाली बेंद्रे नसणार आहे. सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर उपचार घेत आहे. तसेच सरफरोश - 2 मध्ये आमीर खान असणार की नाही यावर मात्र अजून पडदा आहे. पण सरफरोश हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीचा आहे. त्यामुळे याचा सिक्वल येत असल्यामुळे प्रेक्षक खूष आहेत. 

सरफरोश प्रमाणेच सरफरोश 2 चे दिग्दर्शन जॉन मैथ्यू आहेत. हल्ली ते या सिनेमाच्या स्क्रिप्टच्या तयारीत आहे. या सिनेमाची कथा देखील देशातील नक्षलवादावर अवलंबून आहे. पहिल्या भागात जो प्रश्न उभा केला आहे त्याचं उत्तर दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरफरोश - 2 मध्ये जॉन अब्राहम लीड रोलमध्ये असणार आहेत. तोच यामध्ये एसीपी अजय राठोडची भूमिका साकारणार आहे. हे कॅरेक्टर पहिल्या भागात आमीर खाने साकारलं होतं. त्यामुळे दुसऱ्या भागात मिस्टर परफेक्शनिस्ट असावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर दुसऱ्या बाजूला जॉन अब्राहम आणि जॉन मैथ्यू यांच्या भेटी देखील झाल्या आहेत. 

तर दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की, त्याने कोणत्याही अभिनेत्याला समोर ठेवून स्क्रिप्ट लिहिलेली नाही. सध्या तो या सिनेमाकरता निर्मात्याच्या शोधात आहे. जॉन अब्राहम सध्या 'रॉ' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Read More