Marathi News> मनोरंजन
Advertisement

जॉनी लिव्हरच्या लेकीकडून आशा भोसलेंची मिमिक्री

जेमी लिव्हरची अशी मिमिक्री पाहून आशा भोसले देखील मनमुराद हसतील       

जॉनी लिव्हरच्या लेकीकडून आशा भोसलेंची मिमिक्री

मुंबई : प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर सध्या चांगलीचं चर्चेत आहे. जेमी लिव्हर सतत सोशल मीडियावर ऍक्टिव असते. ती सोशल मीडियावर तिच्या विनोदी बुद्धीने चाहत्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडते. आता देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ती कायम तिच्या विनोदी अंदाजात सेलिब्रिटींची मिमिक्री करत असते. आता तर जेमीने चक्क गायक आशा भोसले यांची मिमिक्री केली. तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

या व्हिडिओमध्ये  जेमीने आशा भोसले यांचं रूप धारण केलं आहे आणि ती गायक नेहा कक्करचा  भाऊ टोनी कक्करवर विनोद करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जेमी म्हणते, 'हा नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर... त्याला मी टोनू म्हणून हाक मारते. त्याचे गाने मला फार आवडतात...' असं जेमी म्हणताना दिसत आहे. 

'आतापर्यंत मिल्क शेक ऐकलं आहे, व्हेनिला शेक ऐकलं आहे... आता तर प्रॉटीन शेक पण कानावर आलं आहे... पण हे 'बुटी शेक' काय आहे.' सध्या तिचा हा विनोदी अंदाज चाहत्यांना आनंद देत आहे. व्हिडिओ शेअर करत जेमीने 'हा कोणता शेक आहे' असं कॅप्शन दिलं आहे. 

या व्हिडिओमध्ये जेमीने टोनी  कक्कर आणि नेहा  कक्करला देखील टॅग केलं आहे. हा विनोदी व्हिडिओ नोटकऱ्यांच्या देखील पसंतीस पडला आहे. यावर नेटकऱ्यांनी  कमेंट देखील केल्या आहेत. जेमी कायम तिच्या विनोदी शैलीने चाहत्यांना हसवत असते. 

Read More