Jubin Nautiyal Accident : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. गायकाचा गंभीर अपघात झाला आहे. घरातील पायऱ्यांवरुन पडल्यामुळे गायकाला गंभीर दुखापत झाली आहे. जुबिन नौटियालच्या हाताला दुखापत झाली आहे. (jubin nautiyal songs )याशिवाय त्याच्या डोक्याला,आणि कपाळावर जखमा आहेत. अपघात झाल्यामुळे जुबिनला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता गायकाला डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
दरम्यान, खुद्द गायकाने रुग्णालयातील एक फोटो शेअर करत स्वतःच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. रुग्णालयातील फोटो शेअर करत गायकाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार... देवाचं माझ्यावर लक्ष होतं... त्यानेच मला जीवघेण्या अपघातापासून वाचवलं आहे. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी लवकरच ठिक होईल...' असं देखील गायक म्हणाला आहे.
Thank you all for your blessings. God was watching over me, and saved me in that fatal accident. got discharged and am recovering well.
— Jubin Nautiyal (@JubinNautiyal) December 2, 2022
Thank you for your never ending love and warm prayers ic.twitter.com/OCP7NRkdSa
जुबिनचा अपघात झाल्याचं कळताच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. शिवाय गायकाची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून चाहते प्रार्थना देखील करत आहेत. (jubin nautiyal new song 2022)
काही दिवसांपूर्वीच गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या आगामी शोमुळं त्याच्यावर अनेकांचाच रोष ओढावला. जुबिनविरोधात उठवल्या गेलेल्या आवाजामुळं त्याला अटक करण्याची मागणी करणाऱ्यांची संख्याही वाढली. पाहता पाहता सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला.
जुबिन ज्या कार्यक्रमात गाणार होता, त्याचा आयोजक एक गुन्हेगार असल्याची बाब हेरत त्याला कडाडून विरोध करण्यात आला. काहींनी तर, या गायकाला देशद्रोही (anti National) म्हणत हिणवलंसुद्धा. कित्येक वर्षांपासून आपण करत असलेल्या मेहनतीवर या सर्व वातावरणामुळं गालबोट लागल्याचं म्हणत त्यानंही नाराजी व्यक्त केली.