Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलीला वाचवण्यासाठी काजलने केली हद्द पार; 'मा' च्या ट्रेलरने प्रेक्षकांना आली 'शैतान'ची आठवण

अभिनेत्री काजोल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते आणि आता ती 'माँ' या भयपट चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे. अजय देवगणच्या सहनिर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.  

मुलीला वाचवण्यासाठी काजलने केली हद्द पार; 'मा' च्या ट्रेलरने प्रेक्षकांना आली 'शैतान'ची आठवण

कथेचा गाभा- आईचं बळ आणि राक्षसी अंधारातली लढाई
'माँ' मध्ये आई आणि मुलीच्या अतूट नात्याची पार्श्वभूमी आहे. काजोल एका आईची भूमिका साकारत आहे, जी आपल्या मुलीला एका रहस्यमय आणि राक्षसी जंगलात सापडलेल्या संकटांपासून वाचवण्यासाठी सर्व काही पणाला लावते. जंगलात एक शक्तिशाली दैत्य लपून बसलेला आहे, जो लहान मुलींच्या रक्ताचे बलिदान मागतो. ट्रेलरमधील दृश्ये अंगावर शहारे आणणारी असून, थरार आणि इमोशन्सचा सुंदर संगम आहे.

'माँ' मध्ये पौराणिकतेचा स्पर्श
चित्रपटात भारतीय पौराणिक कथांशी मिळती-जुळती कल्पना वापरली गेली आहे. या अज्ञात जंगलातील राक्षस केवळ एक भयानक व्यक्तिरेखा नाही, तर तो एक पौराणिक शक्तीचे प्रतीक आहे. अशा प्रकारचा पौराणिक-हॉरर हा भारतीय चित्रपट सृष्टीसाठी नवीन प्रयोग मानला जात आहे. अजय देवगण म्हणतो, 'मला जाणवले की हॉरर कॉमेडी चित्रपट बनवले जात आहेत. पण कोणीही पौराणिक-हॉरर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही. आपण अशा पौराणिक कथा ऐकत आलो आहोत पण कोणीही तो करण्याचा प्रयत्न केलेला नाही. हॉलिवूडमध्ये अशी पात्रे बनवली जातात ज्यांच्याकडे पौराणिक कथा नसतात. आपल्याकडे ती आहेत, पण तरीही कोणीही तो करण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणून, आम्ही हा चित्रपट तयार केला.'

काजोलचा अभिनय
ट्रेलरमध्ये काजोलचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. एका आईची भीती, घाबरलेला चेहरा, पण तरीही मुलीसाठी असलेलं बळ हे सगळं ती सहजतेने साकारते. तिच्या डोळ्यांमधून भीती, चिंता आणि आक्रोश सारं काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. हे तिच्या अनुभवी अभिनय कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे.

दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी
विशाल फुरिया, ज्यांनी 'छोरी' आणि 'लपाछपी' यांसारखे इतर भयपट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, ते 'माँ' चे दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेमॅटोग्राफी आणि वातावरणनिर्मितीवर विशेष भर दिला आहे. ट्रेलरमधील गडद रंगछटा, अनोळखी आवाज, निसर्गातली झपाटलेली शांतता या सर्वांनी भयानकतेचा अनुभव अधिक तीव्र केला आहे.

हे ही वाचा: 'मी पुरुषासारखी दिसते' बॉलिवूड अभिनेत्रीने पहिल्यांदाच मांडला बॉडी शेमिंगवर भावनिक संघर्ष; 26 इंची कंबर...

चित्रपटात आणखी कोण कोण?
चित्रपटात काजोलसोबत इंद्रनील सेनगुप्ता, रोनित रॉय आणि सूर्यशिखा दास महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. सर्व पात्रांचे लूक आणि स्क्रीन प्रेझेन्स ट्रेलरमध्ये प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवतात.

ट्रेलर रिलीज होताच अनेकांनी ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या दृश्याचं आणि काजोलच्या परफॉर्मन्सचं भरभरून कौतुक केलं. काही चाहते म्हणतात की, 'काजोल पुन्हा एकदा बॉलिवूडची 'क्वीन ऑफ एक्सप्रेशन' ठरली आहे.' हा चित्रपट 27 जून 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'माँ' केवळ भयपट नाही, तर एका आईच्या ममतेची, धैर्याची आणि त्यागाची कथा आहे. काजोलचा अभिनय, गूढ वातावरण, पौराणिक कथानक आणि अजय देवगणसारख्या निर्मात्याची साथ यामुळे 'माँ' चित्रपट एक खास अनुभव ठरणार आहे.

Read More