Kajol Nysa Devgan : बॉलिवूड अभिनेत्री काजोलची लेक न्यासा देवगण ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर काजोल देखील तिच्याविषयी अनेक गोष्टी सांगताना दिसते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलनं सांगितलं की नीसाला मुलगी नाही तर दोन मुलांची आई व्हायचं आहे.
काजोलनं या मुलाखतीत तिच्या मुलीसोबत तिचं नातं कसं आहे याविषयी सांगितलं. तिनं सांगितलं की आई आणि मुलगी असले तरी त्यांचं नातं हे मैत्रीचं आहे. तिनं सांगितलं की ती तिच्या दोन्ही मुलांची अर्थात नीसा आणि युगची मैत्रिण होण्याचा प्रयत्न करत आहे. तिला तिच्या मुलांसोबत जास्त स्ट्रिक्ट व्हायचं नाही. या सगळ्याविषयी चर्चा करत असताना काजोलनं सांगितलं की ती नेहमीच मुलगी नीसा देवगणला सांगते की जेव्हा ती स्वत: आई होईल ना, तेव्हा तिला कळेल की आई झाल्यावर काय होतं. त्यातही एका मुलीचं आई होणं काय असतं.
पुढे काजोलनं हे देखील सांगितलं की तिची मुलगी नीसाला मुलगी नाही तर मुलांची आई व्हायचं आहे. नीसाला वाटतं की मुलांची आई होणं अर्थात त्यांचा सांभाळ करणं हे सोपं असतं.
दरम्यान, काजोलच्या प्रोजेक्टसविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'मा' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे. ती तिच्या मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं आहे. या चित्रपटातील गाणं काली शक्ती प्रदर्शित झालं असून सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, या गाण्यातली एक क्लीप नीसानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही क्लीप शेअर करत नीसानं लिहिलं की जेव्हा काम करून ती घरी येते आणि मी झोपलेली असते तेव्हा ती कशी असते. अर्थात नीसानं तिच्या काली मातेच्या रुपाचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा : काजोलचा देवावरून उडाला विश्वास! म्हणाली, 'आठवड्याभरात जे झालं त्यानंतर...'
काजोलच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरियानं केलं आहे. तर अजय देवगण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. कारण शैतान या चित्रपटाची कुठेतरी एक झलक पाहायला मिळत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.