बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या आपल्या आगामी 'माँ' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमत्ताने काजोलने नुकतंच आपल्या पालकत्वाच्या प्रवासावर भाष्य केलं आहे. काजोल आणि अजय यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. मुलांना वाढवताना मी आणि अजयने कशाप्रकारे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. अजय मुलं लहान असताना दिवसातून दोन वेळा त्यांचे डायपरही बदलायचा असंही काजोलने सांगितलं आहे.
News18 Showsha ला दिलेल्या मुलाखतीत, काजोलने ती गर्भवती असतानाच्या दिवसांची आठवण सांगितली आहे. तसंच आपण आता मुलांचे डायपर बदलावे लागत नाहीत याबद्दल आनंदी असल्याचंही काजोलने म्हटलं आहे.
काजोलने म्हटलं की, "मला वाटत नाही की आम्ही कधी अशा पद्धतीने वागलो आहोत. जर मी तिथे असेन तर मी मुलांचा सांभाळ करेन आणि तो असेल तर तो करणार. हे इतकं सोपं आहे. पण सर्वोत्तम बाब म्हणजे, आता आमच्या मुलांचे डायपर आधीसारखे बदलावे लागत नाहीत. जेव्हा न्यासा आणि युग लहान होते अजय त्यांचे डायपर एकदा का दोनदा बदलायचा. तो सांगेल की मी दोनपेक्षा जास्त वेळा डायपर बदलले आहेत. पण मी त्याच्याशी सहमत नसेन".
"आता आम्ही तो टप्पा गाठला आहे, आणि आता ती जबाबदारी अधिकपणे घेण्यास तयार नाही. आम्ही आता नीट आहोत. आता फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवणं आणि त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करणं याकडे जास्त कल असतो. ही भूमिका आता फार सहज असते," असं काजोल म्हणाला.
काजोलने युग पोटात असताना आपण फार चिंतेत नव्हतो, तर मजेत होते असं काजोलने मान्य केलं आहे. सप्टेंबर 2010 रोजी काजोलने युगला जन्म दिला. तसंच गर्भवती असताना दोन्ही वेळी आपण काम करत असल्याने, चांगली मदत झाली असंही म्हटलं आहे.
काजोल आणि अजयचं लग्न होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. 1995 मध्ये 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यांनी जवळजवळ 4 वर्षं डेटिंग केलं आणि 1999 मध्ये लग्न केले. प्यार तो होना ही था, इश्क, दिल क्या करे, राजू चाचा आणि तानाजी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
काजोल अलिकडेच 'माँ' या हॉरर चित्रपटात दिसली होती. विशाल फुरिया दिग्दर्शित या चित्रपटात रोनित रॉय, खेरिन शर्मा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला एकूणच मिश्र प्रतिसाद मिळाला. यानंतर ती 'सरजमीन' मध्ये दिसणार आहे. बोमन इराणींचा मुलगा कायोज इराणी दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटात इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 25 जुलै रोजी जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.